यशवंतराव चव्हाण यांची जयंती न्यू मॉडल डिग्री कॉलेज हिंगोली येथे साजरी
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज, हिंगोली येथे आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण यांची 113 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यावेळी प्रा. डॉ. ए. एम. कदम यांनी मा. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. मा. यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
उपस्थित सर्वांनी मा. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी डाॅ. पवन वासनिक, डॉ. संभाजी चौतमल, प्रा. सुनिल पाटील, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. सुभाष मापारी, प्रा. गौरव गोरे, प्रा. स्नेहा शिर्के, प्रा. ऊषा किरवले, प्रा. अलका करंडे, प्रा. यामिनी दास, डॉ. वाय. एम. काशिदे, प्रा. विजय कांबळे, प्रा. अमोल अवचार, श्याम खर्जुले, प्रा. सुभाष चव्हाण, प्रा. सिद्धार्थ काशिदे, प्रा. रजत सातपुते तसेच श्री. संजय डाके, श्री. गजानन शिंदे, श्री. राजेंद्र केदारे, श्री. गजानन कऱ्हाळे, श्री. पाशुभाई शेख, श्री. किरण लोडे
व विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.
