समाज रत्न पुरस्कार 2025-26 ने सुप्रसिद्ध गायक राज प्रल्हादराव रायते यांचा सन्मान
जामनेर (प्रतिनिधी) अजय चौधरी– श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज जनसेवा बहुउद्देशीय संस्था, जामनेर (ता. जामनेर, जि. जळगाव) यांच्या वतीने “समाज रत्न पुरस्कार 2025-26” हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक श्री. राज प्रल्हादराव रायते यांना प्रदान करण्यात येणार आहे.
समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या श्री. रायते यांनी आपल्या सुमधुर आवाजातून संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार समाजात करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या गाण्यांमधून समाजाला प्रेरणा मिळत असून संताजी महाराजांच्या कार्याचा संदेश दूरदूरपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे.
तेली समाजाच्या उन्नतीसाठी आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत तेली समाज बहुउद्देशीय संस्था, जामनेर यांच्या वतीने त्यांना “तेली समाज गण रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण तेली समाज बांधवांमध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संस्थेचे अध्यक्ष श्री. अजय अशोक चौधरी व सचिव श्री. निलेश हरी पाटील यांनी श्री. रायते यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उपाध्यक्ष श्री. सोपान पांडुरंग चौधरी, सहसचिव श्री. विशाल शालिग्राम चौधरी, खजिनदार श्री. निलेश रमेश चौधरी, संघटक श्री. अविनाश वामन चौधरी, कार्याध्यक्ष सौ. प्राणाली सुबोध चौधरी, सहकार्याध्यक्ष श्री. वासुदेव सोपान चौधरी, मार्गदर्शक डॉ. सौ. योगिता पांडुरंग चौधरी, तसेच सदस्य श्रीमती स्वाती रमेश चौधरी व श्री. चेतन समाधान चौधरी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे.
श्री. राज रायते यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
