आंतरराष्ट्रीय कथाकार प.पू.भाईश्री रमेशभाई ओझा यांनी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे घेतले दर्शन,नागनाथ संस्थानकडून सत्कार
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर श्रीमद् भागवत कथा सुरू आहे. त्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय कथाकार परमपूज्य भाईश्री रमेशभाई ओझा हे आले आहेत .सोमवार (ता.२३) मार्च रोजी सकाळी ११ वाजता कथाकार परमपूज्य भाईश्री रमेशभाई ओझा यांनी आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे दर्शन घेऊन महापूजा केली. महापूजा झाल्यानंतर त्यांचा नागनाथ देवस्थानच्यावतीने नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार ,पोलीस निरीक्षक जी एस राहिरे,व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मुख्यपुजारी तुळजादास भोपी, श्रीपाद भोपी ,सुरक्षा प्रमुख बबन सोनूने,कृष्णा पाटील, नागेश माने, गणेश जगताप ,जगदेव दिंडे, मुकेश पडोळे ,देवा देशमुख ,नामदेव पाटील, प्रवीण जोशी ,प्रवीण गोबाडे, रामप्रसाद उदगीरे ,गजानन उदगीरे यांच्यासह नागनाथ मंदिरातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
