कारधा पोलिसांची अवैध हातभट्टीवर रेड….
एकूण 1,30,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…
भंडारा:- दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी कारधा पोलीस यांना गुप्त माहिती मिळाली की करजखेडा येथे वैनगंगा नदीच्या काठावर अवैध मोहफुलाची हातभट्टी दारू काढत असल्याची माहिती मिळताच कारधा पोलीस यांनी रेड केली. त्या ठिकाणी आरोपी नामे फत्तू बक्षी मेश्राम वय 60 वर्ष, राहणार करजखेडा. तालुका जिल्हा भंडारा यांना ताब्यात घेतले. त्या वैनगंगा नदीच्या काठावर मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून एका लोखंडी ड्रम मध्ये 20 किलो गरम मोहपास किंमत 4000 रुपये, 30 प्लास्टिक चुंबळी मध्ये प्रत्येकी 20 किलो असा अंदाजे सहाशे किलो सडवा मोहपास किंमत 1,20,000/-, एका काळ्या रंगाच्या प्लास्टिक ट्यूब मध्ये अंदाजे 20 लिटर हात भट्टी दारू किंमत 4000/-रुपये, पाच जलावू काळ्या किंमत 1000/-रुपये, एक जर्मन कडची किंमत 1000 रुपये, एक नेवार पट्टी किंमत 00/-रुपये, एक विटा मातीची चुली किंमत 00/-रुपये, एक लोखंडी ड्रम 500/- रुपये, असा एकूण 1,30,500/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अप क्रमांक 366/2026 कलम 65 (ई) (फ)(ब)(क)(ड) म.दा. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे साहेब, पोलीस निरीक्षक कारधा श्री गोकुळ सूर्यवंशी साहेब, यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार केंद्रे, व पोलीस स्टॉप कारधा यांनी केली असून पुढील तपास कारधा पोलीस अधिकारी करीत आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
