उमरखेड पोलिसांची कारवाई : धारदार शस्त्रांसह तरुण ताब्यात
उमरखेड : उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
दि. 07 एप्रिल 2026 रोजी चिल्ली येथे सय्यद इरफान सय्यद मुस्तफा (वय 21, रा. चिल्ली, ता. उमरखेड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार, चाकू व मोठा सुरा असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंथा (भा.पो.से.), मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात (मा.पो.से.), पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार — सपोनि/धीरज बांडे, पोहवा/शरद लहोटे, सपोनि/मुनाफ शेख, पोहवा/संतोष भारंगे, पोहवा/तेजस रणखांब, पोहवा/सुमित जाधव, पोहवा/कुशल मुंडेकर, पोहवा/रमेश राठोड, पोशी/सुनील पंडागळे, चापोनि/रविंद्र शिरसाट, पोशी/राजेश जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
तालुका प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख mo: 9067934036
