भारतात 20 पुरस्कारा पैकी काळी (दौलत ) चे डॉ. अरविंद भीमराव पवार

भारतात 20 पुरस्कारा पैकी काळी (दौलत ) चे डॉ. अरविंद भीमराव पवार यांना बंजारा विद्या ज्योती च्या पुरस्कारा चे मानकरी

 

प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव

 

डॉ‌.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर,विंड्सर प्लेस,नवी दिल्ली येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती व रुपसिंग महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य सोहळा संपन्न झाला.यामध्ये संपूर्ण भारतातून गोर बंजारा लमाण बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.*या प्रसंगी, महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.श्री.संजय राठोड साहेब,माजी खासदार (कलबुर्गीं,कर्नाटक) डॉ.श्री.उमेश जाधव साहेब,श्री शंकर पवार साहेब, श्री शेखर महाराज (पोहरादेवी) ,श्री जाटोथ हुसेन नायक, श्री रामुलु नायक,श्री काशिनाथ बिरादर व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत डॉ.अरविंद भिमराव पवार (संस्थापक अध्यक्ष गोर आर्मी तथा विदर्भ प्रांत सहसंयोजक,वैद्यकीय आघाडी,भाजपा) यांना मानाचा “बंजारा विद्या ज्योती पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पुरस्कार प्रदान सोहळ्यात श्री राम राठोड(मुंबई) यांनी डॉ अरविंद पवार यांच्या विषयी गौरवोद्गार काढताना असे म्हटले कि *डॉ.अरविंद पवार यांनी संपुर्ण भारतातील अनेक राज्यांमध्ये विशेषतः तांड्यांमध्ये स्वखर्चाने जाऊन तेथील स्थानिक संस्कृती समजून घेतली आणि युवक व अशिक्षित लोकांना मार्गदर्शन केले.तसेच आपल्या भाषणातून उच्च शिक्षण,संशोधन,तंत्रज्ञान, आरोग्य,नौकरी,व्यवसाय,

कला,खेळ,संगीत,नृत्य यासह आधुनिक व स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी इतर यांत्रिक कौशल्ये विकसित करण्याकरीता त्यांचे महत्त्व गोर बंजारा बोली,मराठी व हिंदि,इंग्रजी भाषेतुन प्रतिपादित केले.या सोबतच त्यांनी सांगितले कि २०२२ मध्ये दिल्ली मध्ये याच ठिकाणावरील सेवालाल जयंती सोहळ्यामध्ये गोर बंजारा- लमाण समाजाचा गौरवशाली इतिहास,रुढी परंपरा,संस्कृती,समाजात होऊन गेलेले महान राजे, महाराजे,वीर योद्धा, सेनापती,महापुरुष यांचा गौरवशाली इतिहास डॉ अरविंद पवार यांनी प्रभावीपणे मांडला होता.आणि यामुळेच या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली असे ही त्यांनी म्हटले.या कार्यक्रमात अनेक राजकीय नेते,उच्च विद्या विभुषित व्यक्ती,प्रसिद्ध साहित्यिक, कलाकार ,प्रशासकीय अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता युवा मोर्चा चे सरचिटणीस विशाल जाधव आणि बंजारा समाजातील तरुण, स्त्रिया,मुले हे हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमात ‘बंजारा विद्या ज्योती पुरस्कार, बंजारा कला पुरस्कार,बंजारा रत्न पुरस्कार,बंजारा उद्योजक पुरस्कार’ ह्या श्रेणी करीता संपूर्ण भारतातील केवळ २० प्रभावी व्यक्तिंना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.तसेच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातील मित्र परीवार,प्रसंशक व सर्व तरुण हे डॉ अरविंद भिमराव पवार यांचे अभिनंदन करत आहेत.तसेच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ अरविंद भि.पवार यांनी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन अभिनंदन केलेल्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.तसेच या पुरस्कारामुळे आणखी जोमाने समाजकार्य करण्यासाठी बळ मिळाले असे मत व्यक्त केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *