महागांव/धनराज निळे पोलीस निरीक्षक. व उपनिरीक्षक अमोल राठोड यांचा निरोप समारंभ संपन्न
महागांव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनराज निळे. व उपनिरीक्षक अमोल राठोड यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संवेदनशीलतेने महागांव तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा आदर्श पॅटर्न निर्माण करणारे ठाणेदार यांचा नुकताच भावपूर्ण निरोप समारंभ दिनांक. ७/६/२०२६रोजी शकू राज मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
ठाणेदार धनराज निळे यांची कळंब तालुका जिल्हा यवतमाळ येथे बदली तर . महागाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल राठोड यांची स्थानिक गणेश शाखा यवतमाळ कॅम्प पुसद येथे एल.सी.बी पथकात एन्ट्री
ठाणेदार धनराज निळे व उपनिरीक्षक अमोल राठोड यांनी महागाव पोलीस स्टेशन हद्दीत वर्दीच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीला वचक तर बसवलाच, पण सोबतच ‘पोलीस आणि जनता’ यांच्यातील समन्वय साधून एक विश्वासाचे वातावरण निर्माण केले. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करताना, पोलीस निरीक्षक धनराज निळे उपनिरीक्षक अमोल राठोड यांनी नेहमीच माध्यमांना सकारात्मक आणि मोलाचे सहकार्य केले.
या निरोप समारंभाप्रसंगी महागाव तालुक्यातील प्रत्येकि पत्रकार संघटना होमगार्ड पथक. नगरपंचायत अधिकारी. महसूल अधिकारी. व तसेच आजी माझी पदाधिकाऱ्यांनी धनराज निळे व अमोल राठोड यांना त्यांच्या भावी वाटचालीस आणि पुढील उज्वल कारकीर्दीस भरभरून फुलगुच्छ शाल श्रीफळ देऊन निरोप समारंभाला संदेश व शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड. अमोल राठोड पोलीस उपनिरीक्षक महागांव.
मान्यवर. उपस्थिती म्हणून संभाजी दादा नरवाडे वनमाला ताई राठोड. लोकमत तालुका प्रतिनिधी श्री संजय भाऊ भगत लोक चिंतन पेपरचे संपादक गजानन वाघमारे . एकता पत्रकार संघ महागावचे समन्वयक श्री संजय भाऊ नागरगोजे. रुपेश देशमुख. व आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉक्टर संदीप शिंदे तर पंजाबराव देशमुख खडकेकर. विजयराव खडसे. शाखा उर्फ प्रमोद भरवाडे. विजय सूर्यवंशी. गुरुवर्य तानाजी बापू बोरकर मुडाणकर मठ यांची उपस्थिती. महागाव पोलीस स्टेशनचे राईट हॅन्ड वसीम शेख.महागाव बीट चे बीड जमादार गजानन येडतकर. व सर्व महागाव पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने निरोप संभारंभ कार्यक्रम संपन्न झाला
