रेती माफियांचा कर्दनकाळ मैदानात जीवघेण्या हल्ल्यानंतर API सुनील अंभोरे पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये

​रेती माफियांचा कर्दनकाळ मैदानात

जीवघेण्या हल्ल्यानंतर API सुनील अंभोरे पुन्हा ‘ॲक्शन मोड’मध्ये

 

यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव

 

 

 

​ कर्तव्यापुढे मृत्यूची भीतीही तुच्छ असते, याचा प्रत्यय देणारे महागाव पोलीस स्टेशनचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक API सुनील अंभोरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. डिसेंबरमध्ये वाळू माफियांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा धैर्याने प्रतिकार केल्यानंतर, अंभोरे यांच्या

पुनरागमनाने महागाव तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.​काय घडली होती

घटना?​१८ डिसेंबर २०२५ रोजी वाकोडी घाटावर पुस नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी API अंभोरे गेले होते. यावेळी रेती माफियांनी संघटितपणे त्यांच्यावर हल्ला चढवला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अंभोरे यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत दोन राऊंड गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी माघार न घेता दोन संशयितांना जागीच अटक केली. त्यांच्या या अचाट धैर्यामुळे संपूर्ण पोलीस दलाची मान उंचावली होती.​खाकीचा दरारा आणि सिंघम स्टाईल पुनरागमन

​जखमांवर उपचार घेऊन पूर्णपणे फिट झाल्यानंतर, यवतमाळ पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या आदेशाने सुनील अंभोरे पुन्हा एकदा महागावच्या रणांगणात सक्रिय झाले आहेत.

​”कायद्याला आव्हान देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा कडक संदेश त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसत आहे.

​ठाणेदार धनराज निळे यांच्या नेतृत्वात धडक मोहीम

​महागाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार धनराज निळे यांनी गेल्या २१ महिन्यांच्या कार्यकाळात इंग्रज काळातले पोलीस स्टेशन यांच्या दुरुस्तीचे छायाचित्र बदलून धनराज निळे साहेब यांची एक छाप उमटली आहे अवैध धंद्यांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. देशी हातभट्टी असो वा वाळू माफिया, निळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अनेकांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता अंभोरे यांच्या पुनरागमनामुळे या मोहिमेला अधिक धार आली आहे.

​नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

​अभोरे यांच्या धाडसी कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. प्रशासनाने या तस्करांवर कायमस्वरूपी लगाम लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. पोलीस प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महागाव तालुक्यातील रेती माफियांचे जाळे आता पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *