भोई समाजातर्फे बहुजन जननायक’ कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांना आदरांजली
कामठी
भारतीय भोई विकास मंडळाचे मुख्य मार्गदर्शक एड. दादासाहेब वलथरे व मंडळाचे अध्यक्ष मनोहर भोयर यांच्या मार्गदर्शनात महासचिव व जीवन रक्षक दल चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस कॅम्पस येथील दादासाहेब कुंभारे परिसरात असलेल्या जननायक कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरात “कर्मवीर दादासाहेब कुंभारे “अमर रहे” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक गणमान्य व्यक्तींनी उपस्थित राहून दादासाहेबांच्या कार्याला वंदन केले.
याप्रसंगी पत्रकार संदीप कांबळे, दिलीप मेश्राम, मनिषा मेश्राम, मुकुंदा गोंडाळे, खेमराज मेश्राम, मनोज बावणे सह मोठ्या संख्येने भोई समाज बांधव उपस्थीत होते.
कामठी तालुका प्रतिनिधी
दिलीप मेश्राम
