काटोल येथे समता सैनिक दलाची भव्य समता रॅली उत्साहात संपन्न

काटोल येथे समता सैनिक दलाची भव्य समता रॅली उत्साहात संपन्न

आरक्षण उपवर्गीकरण निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकडो समता सैनिकांचा सहभाग; गंधकुटी पर्वत (बुद्धभूमी) येथे २,४०० चौ. फूट जागा दानाची घोषणा

काटोल प्रतिनिधी :

समता सैनिक दल, दीक्षाभूमी (01) नागपूर ग्रामीण यांच्या वतीने अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरण (विभाजन) निर्णयाच्या निषेधार्थ तसेच हा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी काटोल येथे भव्य समता रॅली काढण्यात आली.

शासकीय विश्रामगृह, काटोल येथून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत उपविभागीय अधिकारी तथा तहसील कार्यालय, काटोल येथे पोहोचली. यावेळी केंद्र व राज्य शासनाने घेतलेला आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला समता सैनिक दल, दीक्षाभूमी (01) नागपूरचे मुख्य संयोजक घनश्यामजी फुसे, प्रमोदजी रामटेके, हेमचंदजी उके, ज्येष्ठ समाजसेवक आयु. गुलाबरावजी तागडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विद्येश्वर गजबे, जिल्हा सचिव दिपक ढोके, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील नारनवरे, मुख्य शाखा संघटक भागवतजी पाटील, पारडसिंगा सर्कल प्रमुख नीलकंठ गजभिये, महिला प्रशिक्षक संध्या सहारे, तालुका प्रमुख लक्ष्मी शेंडे, जिल्हा शाखा संघटक विकास सोमकुवर, सावरगाव सर्कल प्रमुख लांजेवार साहेब, दिलीपजी गायकवाड (जनसेवक), रवींद्र नाईक, दयाकर काटकर, युवराज तायडे, वसंतराव डोंगरे, बळवंता नारनवरे, नामदेव तागडे, प्रमोद चक्रपाणी, गायक व विकासराज गायक यांच्यासह नागपूर ग्रामीणमधील तेहतीस (३३) गावांतील पदाधिकारी आणि शेकडो समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणून ज्येष्ठ समाजसेवक आयु. गुलाबरावजी तागडे चिखली (मैना ) यांनी गंधकुटी पर्वत (बुद्धभूमी), घुबडमेट येथे असलेली ४० × ६० (२,४०० चौ. फूट) जागा समता सैनिक दल, दीक्षाभूमी (01) नागपूर ग्रामीण, ता. काटोल यांच्या कार्यासाठी दान देण्याची जाहीर घोषणा केली. त्यांच्या या उदात्त निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.

रॅलीदरम्यान “जय भीम”, “संविधान बचाव”, “आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

समता सैनिक दलाच्या या भव्य समता रॅलीतून सामाजिक ऐक्य, संविधान रक्षण आणि हक्कांच्या लढ्यासाठी संघटित राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

प्रतिनिधी,अरविंद मदने काटोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *