*मोहपा येथील नवनिर्मित पोलीस ठाण्याचा लोकार्पण सोमोहपा येथील नवनिर्मित पोलीस ठाण्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न*हळा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न*

 

*सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी होणार*: आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचा विश्वास.

• नागरिकांना मिळणार अधिक सक्षम, आधुनिक व लोकाभिमुख पोलीस सेवा.

नागपूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलांतर्गत मोहपा येथे नवनिर्मित पोलीस ठाण्याचे लोकार्पण नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहपा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे, यासाठी आमदार डॉ देशमुख सतत प्रयत्नरत होते. स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मोहपा व परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, तत्पर, आधुनिक आणि लोकाभिमुख पोलीस सेवा उपलब्ध होणार असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मोठी मदत होणार आहे.मोहपा शहरासह परिसरातील ग्रामीण भागाचा वाढता विस्तार, नागरिकांची वाढती संख्या आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या विविध गरजा लक्षात घेता स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता होती. नवनिर्मित पोलीस ठाण्यामुळे नागरिकांना तक्रारींची नोंद, पोलीस सेवा तसेच आवश्यक कायदेशीर मदत अधिक सुलभ आणि जलदगतीने मिळणार आहे. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या विकासकामांच्या तीव्र गतीमुळे सावनेर-कळमेश्वर मतदारसंघाचा कायापालट होत आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

यावेळी बोलताना आमदार डॉ. आशिषराव देशमुख म्हणाले, “मोहपा येथे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू झाल्यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येईल. नवीन पोलीस ठाण्यामुळे सावनेर आणि कळमेश्वर पोलीस ठाण्यांवरील कामाचा ताण कमी होऊन मोहपा व परिसरात पोलिसांची अधिक प्रभावी देखरेख राहणार आहे. नागरिकांना जलद, पारदर्शक, संवेदनशील आणि लोकाभिमुख पोलीस सेवा मिळण्यास यामुळे निश्चितच मदत होईल.”

गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात आता पायाभूत सुविधा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही सकारात्मक बदल घडत असल्याचे आमदार डॉ. देशमुख यांनी नमूद केले. खापरखेडा पोलीस ठाण्याचे नागपूर शहर पोलीस दलाकडे वर्गीकरण केल्यामुळे तिथल्या परिसरातील गुन्हेगारीला आळा बसला आहे. तिथल्या लोकांच्या मनातील भीतीचे वातावरण कमी झाले आहे. तसेच सावनेर येथे सुमारे ४४ कोटी रुपये खर्चाच्या नवीन न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन, या माध्यमातून मतदारसंघातील न्यायव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणेला अधिक बळकटी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.नवीन पोलीस ठाण्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे तसेच महिला, बालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद अधिक तत्पर होण्यासही यामुळे मदत होणार आहे. नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून लोकाभिमुख पोलीस व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पोलीस ठाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आमदार डॉ. आशिषराव देशमुख पुढे म्हणाले, “एकेकाळी गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या चर्चेत असलेल्या सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघाची ओळख आता विकास, सुरक्षितता, न्याय आणि सुव्यवस्थेसाठी निर्माण व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांना प्राधान्य दिले जाईल.”

याप्रसंगी पोलीस पाटील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस पाटील हा गावाचा खरा पहारेदार आहे. तो गावाचा सलोखा व्यवस्थित ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. पोलीस पाटीलांना 70 वर्षात जो न्याय मिळू शकला नाही, तो मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 15 हजार रुपये मानधान देऊन त्यांचा मानसन्मान केला, असे आमदार डॉ देशमुख यांनी म्हटले.

लोकार्पण सोहळ्यास खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोहपा येथे नवनिर्मित पोलीस ठाण्याची सुरुवात ही परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला बळ देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच नागरिकांना पोलीस प्रशासनाशी अधिक सुलभ आणि जलद संपर्क साधता येणार आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *