*कावड यात्रेकरूंना चिरडून पळणारा क्रूझर चालक नांदेडमधून ताब्यात; उमरखेड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी*
*उमरखेड, दि. ७ :* उमरखेड शहरात ६ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वर पायी कावड यात्रा घेऊन जाणाऱ्या यात्रेकरूंना अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन पळ काढल्याची घटना घडली होती.
या अपघातात कावड यात्रेकरू विशाल दिपक पवार (वय ३०, रा. उमरखेड) यांचा मृत्यू झाला, तर १० ते १२ यात्रेकरू गंभीर व किरकोळ जखमी झाले होते. फिर्यादी अनुराग गजानन कदम (वय १८) यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलीस स्टेशन येथे अप. क्र. ८५३/२०२६ कलम १०६(१) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेमुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीस तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी दिले होते. त्यानुसार ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात डी.बी. पथकाने आरोपीचा पाठलाग करून आज सकाळी लोहार, जि. नांदेड येथून क्रूझर गाडी क्र. एमएच २६/ए.के. ७३६७ चा चालक परीमोहम्मद चाँद शेख (वय ४३, रा. शिवनी जामगा, ता. लोहा) यास ताब्यात घेतले. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सपोनि अमोल गुंडे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव कायंदे-पाटील आणि पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
उमरखेड प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख संपर्क क्रमांक .9067934036
