*विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, कोळसा येथे ‘स्वयं-शासन दिन’ उत्साहात साजरा..
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली: विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा संचलित विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, कोळसा येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 08 ऑगस्ट 2026 रोजी *’स्वयं-शासन दिन’* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेचा कारभार आणि शिक्षकाची भूमिका समजावी या हेतूने विद्यार्थ्यांकडे शाळेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.या दिवशी इयत्ता 10 वी ची विद्यार्थिनी कु. पुनम माधव धोंडगे हिने मुख्याध्यापक म्हणून तर सौरभ बिरगड याने उपमुख्याध्यापक म्हणून भूमिका पार पाडली. तसेच शाळेतील इतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून इयत्ता 1ली ते 9 वी च्या वर्गांवर अध्यापनाचे काम अतिशय शिस्तप्रिय आणि आत्मविश्वासाने पार पाडले. विद्यार्थी शिक्षकांनी फळ्याचा वापर, अभ्यासक्रमाचे नियोजन आणि शिस्त राखण्याचे काम चोख बजावले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.या वेळी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब, सचिव श्री अंकुशराव बेंगाळ, उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई बेंगाळ, प्राचार्य श्री अभिषेक भैय्या बेंगाळ, मुख्याध्यापक श्री शिंदे आर. बी. सर,श्री सरकटे व्ही. एस. सर, पर्यवेक्षक श्री कसाब सर, परीक्षा प्रमुख श्री चोपडे सर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.मान्यवरांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले व अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो असे गौरवोद्गार काढले.हा स्वयं-शासन दिन शाळेसाठी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
