ऊस उत्पादक संघटनेच्या निवेदनाची दखल; विदर्भातील साखर कारखान्यांना सूचना
उमरखेड :ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उमरखेड तालुका ऊस उत्पादक संघटनेच्या वतीने साखर महासंचालनालय, अमरावती विभाग यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत साखर महासंचालनालयाने विदर्भातील सर्व साखर कारखान्यांना पत्र काढून आवश्यक सूचना दिल्या आहेत.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे तसेच ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, यासह विविध मागण्या संघटनेच्या निवेदनातून करण्यात आल्या होत्या.
संघटनेने मांडलेल्या मागण्यांची दखल घेत संबंधित विभागाने विदर्भातील साखर कारखान्यांना सूचना दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्रशासकीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे.
“शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि योग्य ऊस दरासाठी संघटनेचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील,” अशी भूमिका उमरखेड तालुका ऊस उत्पादक संघटनेने व्यक्त केली आहे.
उमरखेड तालुका प्रतिनिधी : बबलू उर्फ मोहम्मद शेख
संपर्क : 9067934036
