मराठवाडा साहित्य परिषदेचा ८३ वा वर्धापनदिन व निमंत्रितांचे कवी संमेलन हिंगोली येथे संपन्न 

मराठवाडा साहित्य परिषदेचा ८३ वा वर्धापनदिन व निमंत्रितांचे कवी संमेलन हिंगोली येथे संपन्न

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली : मराठवाडा साहित्य परिषदेचा ८३ वा वर्धापनदिन आणि त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले कवी संमेलन रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगोली येथे उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म सा प चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे (वाशीम) हे होते. मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे,उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे,श्री रामचंद्र तिरुके,डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते,डॉ. दीपा क्षीरसागर, मराठवाड्यातून आलेले नामवंत लेखक, मान्यवर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच नामदेव वाबळे,महारुद्र घेणेकर, दिलीप धामणे उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर, विजय वाकडे व प्रा. विलास वैद्य या ज्येष्ठ साहित्यिकांचा साहित्यातील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रा.कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठवाड्याच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत मराठवाडा साहित्य परिषदेचे महत्त्वपूर्ण योगदान विशद केले. संत नामदेवांच्या या भूमीत साहित्याची रुजवणूक शेकडो वर्षांपासून झालेली आहे तीच परंपरा ज्येष्ठ साहित्यिकांनी पुढे सुरू ठेवली मसापणे वाचन संस्कृती व लेखन संस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रम योजना अंमलात आणल्या. दादा गोरे यांनी साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देणे तसेच साहित्यप्रेमींमध्ये वाचन व लेखनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात असे सांगितले. त्याच परंपरेचा एक भाग म्हणून मराठवाडा साहित्य परिषदच्या वतीने या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तीनही साहित्यिकांच्या साहित्यिक रचनांवर प्रकाश टाकण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना तीनही मान्यवरांनी ऋण व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संचलन राधिका देशमुख यांनी व आभार प्रदर्शन दिलीप धामणे यांनी केले.

सकाळ सत्रा मध्ये मराठवाडा साहित्य परिषदे ची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. तदनंतर आजीवन सभासदांची आमसभा पार पडली‌ त्यामध्ये विविध ठरावांवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन सर्वांनुमते ठराव पास करण्यात आले. विविध संमेलनांच्या नियोजनाविषयी चर्चा झाली. विविध जिल्ह्यांमधून आलेल्या शाखाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या सूचना, प्रतिक्रिया व ठाले पाटील यांचे मार्गदर्शन असा भरगच्च कार्यक्रम पार पडला.

वर्धापनदिन समारंभानंतर सायंकाळी निमंत्रितांचे कवी संमेलन संपन्न झाले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास वैद्य होते. मसापचे हिंगोली शाखा अध्यक्ष अशोक अर्धापुरकर यांनी प्रास्ताविक केले तर दिलीप धामणे यांनी ओघवते सूत्रसंचालन केले. महारुद्र घेणेकर,प्रकाश अंभोरे, शफी बोल्डेकर, गणेश आघाव, कलानंद जाधव, मुरलीधर पंढरकर, राजाराम बनसकर, सिंधुताई दहिफळे, राजकुमार मोरगे, दिलीप धामणे, पारिजात देशमुख, रघुनाथ घुगे, राधिका देशमुख, विजय ठाकरे, रसिका विडोळकर, गायत्री दरगु, सविता देशमुख, गौरी गुंडेवार, शिवदास पोटे, विजय गुंडेकर, मनोहर दिपके, शिवाजी कऱ्हाळे, श्रीरंग थोरात, महेश मंगनाळे यांनी बहारदार कविता सादर केल्या.

या कवी संमेलनाच्या माध्यमातून विविध विषयांवरील कविता, सामाजिक जाणीवा, मानवी संवेदना, ग्रामीण जीवन, साहित्यिक अनुभव आणि समकालीन वास्तवाचे प्रतिबिंब रसिकांना अनुभवता आले. त्यामुळे हिंगोलीसह जिल्ह्यातील साहित्यप्रेमींसाठी हा कार्यक्रम विशेष पर्वणी ठरला.

या वर्धापनदिन सोहळ्यास, कवी संमेलनास साहित्यप्रेमी माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, नगरसेवक प्रा बलखंडे, उज्ज्वल इंग्लिश स्कूलचे संस्थापक चंद्रकांत पाईकराव, थवा प्रकाशनाचे गोडाती काळे, रघुवीर पतंगे, विजया पतंगे,ग्रंथपाल ससे, गाडे, दिपके काव्यरसिक, लेखक, कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर व शाखा हिंगोली शाखेचे सर्व सदस्य यांच्या परिश्रमातून यशस्वी करण्यात आले.

साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, साहित्यिकांच्या उपस्थितीत वर्धापनदिन सोहळा आणि जिल्ह्यातील मान्यवर व नवोदित कवींच्या काव्यवाचनाने हा साहित्यिक सोहळा उज्वल इंग्लिश स्कूल, हिंगोली येथे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *