डिग्रस येथील किर्तन महोत्सवा मध्ये हभप संजीवनीताई चौतमल यांचे कीर्तन
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे सार्वजनिक नवदुर्गा मंडळ यांच्यावतीने दिनांक 11 ऑक्टोबर पासून कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या कीर्तन महोत्सवांमध्ये अनेक नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये हभप गणेश महाराज कऱ्हाळे
हभप पंढरीनाथ महाराज कऱ्हाळे हभप रामकिशन महाराज कऱ्हाळे दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ ते दहा या वेळेत हभप भाग्यश्री ताई मोहिते यांचे कीर्तन होणार आहे.तसेच दि 15 ऑक्टोबर रोजी हभप विठ्ठल महाराज देविदास महाराज यांच्या भजनाचा जागर हा कार्यक्रम होणार आहे
दि16 ऑक्टोबर रोजी ह भ प संजीवनी ताई चौतमल दि17 ऑक्टोबर रोजी हभप गिरजाताई टवले दि 18 ऑक्टोबर रोजी हभप कान्होपात्रा ताई शिंदे दि 19 ऑक्टोबर रोजी हभप शितलताई देवकते दि 20 ऑक्टोबर रोजी हभप दादाराव महाराज कऱ्हाळे यांचे कीर्तन होणार आहे. या कीर्तन महोत्सव मध्ये मृदंगाचार्य म्हणून सचिन राखुंडे गायनाचार्य म्हणून देविदास महाराज केसापूर, नामदेव महाराज डिग्रसकर उपस्थित राहणार आहेत.दि 20 ऑक्टोबर रोजी अभय महाराज यांच्या उपस्थितीत होमहवन होईल. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी महाप्रसाद होईल अशी माहिती सार्वजनिक नवदुर्गा मंडळ डिग्रस कऱ्हाळे यांनी दिली.
