*पश्चिम नागपूर (सुरेंद्रगड) : आई दुर्गा यांच्या दर्शनासाठी ज्वाला जांबुवंतराव घोटे यांची उपस्थिती*
पश्चिम नागपूरमधील सुरेंद्रगड येथील बहुचर्चित आणि सुप्रसिद्ध ‘सौमिनरी हिल्स की महाराणी’ आई दुर्गा यांच्या दर्शनासाठी अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव घोटे यांनी भेट दिली.
यावेळी मंडळाच्या वतीने ज्वाला घोटे यांचे स्वागत करण्यात आले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या भेटीदरम्यान विविध सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
या प्रसंगी ओबीसी नेते श्री. नरेशभाऊ बरडे, नगरसेविका सौ. साधनाताई बरडे, युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. चंदनभैय्या ठाकूर, श्री. कैलासभाऊ शेडामे तसेच जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुरेंद्रभाऊ तायवाडे उपस्थित होते.
*रिपोर्ट : जयश्री चव्हाण*
