हिंगणा येथील आधार नगरीत घरात पुरलेला मृतदेह आढळला; परिसरात खळबळ*

*हिंगणा येथील आधार नगरीत घरात पुरलेला मृतदेह आढळला; परिसरात खळबळ*

 

*नागपूर प्नतिनिधी;जयश्री चव्हाण*

 

 

 

चंद्रपूर पोलिसांनी हिंगणा पोलिसांच्या मदतीने खोदकाम करून मृतदेह घेतला ताब्यात

 

हिंगणा, नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आधार नगरी परिसरात एका घरात पुरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती मूळची चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. आधार नगरी येथील तीन खोल्या असलेल्या एका घरात मृतदेह पुरण्यात आला होता.

 

घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर पोलिसांच्या पथकाने हिंगणा पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संबंधित ठिकाणी खोदकाम करून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोलिसांनी तो ताब्यात घेतला.

 

मृत्यूचे नेमके कारण काय? मृतदेह घरात कोणी आणि कोणत्या परिस्थितीत पुरला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख, मृत्यूचे कारण आणि इतर तपशीलांबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *