आंतरमहाविद्यालयीन युवकमहोत्सवात कै.बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय तीन पारितोषिकांचा मानकरी
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सायन्स कॉलेज नांदेड आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवकमहोत्सव ज्ञानतीर्थ – 2026 मध्ये कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय उमरी तीन पदकांचे मानकरी ठरले. कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय स्थळछायाचित्रण या कलाप्रकार प्रथम येऊन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले, या स्पर्धेत अर्जुन विनायक सावंत याने सहभाग घेतला होता. कलात्मक जुळवणी या कलाप्रकारात तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. या कला प्रकारांमध्ये प्रमोद रावसाहेब पिंगळे, विशाल प्रकाश पवळे, अविनाश विद्यानंद मिसाळे, युवराज चांदराव तूपसाखरे ह्या स्पर्धक कलावंतांनी सहभाग घेतला होता. कथाकथन प्रकारात तृतीय पारितोषिक कांस्यपदकाच्या रूपाने प्राप्त झाले, यामध्ये सानिका संजय सोनटक्के हिने सहभाग घेतला होता.
या उज्ज्वल यशाबद्दल महाविद्यालयास नावलौकिक करून दिल्याबद्दल श्री.लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव मा. शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर साहेब, नूतन विद्यालय सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव मा. कैलासभाऊ देशमुख गोरठेकर साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पुरूषोत्तम गाटे, उप- प्राचार्य डाॅ. विलास गणिपुरकर, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच रांगोळी, चित्रकला, मृर्दमूर्ती कला, पोस्टर मेकिंग मध्ये राधिका प्रल्हाद सीतावर, वक्तृत्व या स्पर्धेमध्ये संध्या मिलिंद सवई, वाद-विवाद स्पर्धेमध्ये संध्या मिलिंद सवई व सुरज सुभाषराव सूर्यवंशी, व्यंगचित्रकला या कला प्रकारात अनिता हनुमंतराव शिंदे, मेहंदी व कोलाज या कलाप्रकारांमध्ये शेख बुशरा अफरोज, सुगमगायन भारतीय, शास्त्रीय वाद्य या कलाप्रकारात राम संभाजी जाधव इत्यादी स्पर्धक कलावंत या युवक महोत्सावात सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धा स्पर्धक कलावंतांनी परिश्रमपूर्वक तयारी करून स्पर्धेमध्ये सादरीकरण केले. मेहंदी साठी साथीदार म्हणून पुनम प्रल्हाद सीतावर सहकार्य मिळाले.
स्थळ छायाचित्रणासाठी डॉ. विजय वाघ व साई राजरवाड यांचे मार्गदर्शन मिळाल. सुमित गायकवाड सुप्रिया मनोरकर, विठ्ठल पवार, मयूर धतूरे, प्रिया ताडेवाड यांनी संघासोबत सोबत राहून प्रोत्साहित केले. संघव्यवस्थापक डाॅ.गजानन देवकर( सांस्कृतिक विभाग प्रमुख) डाॅ.सदानंद वडजे,संघव्यवस्थापिका म्हणून प्रा.प्रतिक्षा पवार यांनी जबाबदारी संभाळली. हा युवक महोत्सव अत्यंत उत्साही, आनंदवर्धक, प्रेरणादायी आणि खेळणी-मेळीच्या वातावरणात पार पडला.स्पर्धकांनी युवक महोत्सवाचा आनंद लुटला. हा युवक महोत्सव अविस्मरणीय ठरला असे संघव्यवस्थापक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ.गजानन देवकर यांनी माध्यमांना सांगितले.
