सोयगाव तहसील कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने मोलखेडा येथील वैफल्यग्रस्त

सोयगाव दि.२० — सोयगाव तहसील कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने मोलखेडा येथील वैफल्यग्रस्त शेतकरी दि.२२ नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक

 

तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

 

 

 

सोयगाव येथे आत्मदहनावर ठाम असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत शेतकऱ्याने दिलेली माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथील रहिवासी असलेले शिवाजी सुकदेव ढेकले यांची मोलखेडा शिवारात गट क्रमांक ९७ मध्ये शेतजमीन असून यामध्ये सोयाबीन पीक लावलेले होते. सोयाबीन काढण्यासाठी शेतात जाण्याकरिता महसूल प्रशासनाने पूर्ण रस्ता मोकळा करून दिलेला नाही या संदर्भात वेळोवेळी तक्रार अर्ज देऊन व स्वतः तहसीलदार, नायबतहसीलदार व मंडळ अधिकारी यांना भेटून देखील न्याय मिळत नसल्याने दि.०३ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याविषयी अर्ज दिलेला होता. दि. २० नोव्हेंबर शुक्रवार रोजी नायब तहसीलदार संभाजीराव देशमुख यांच्याकडे दि.२२ नोव्हेंबर रोजी सोयगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आत्मदहन करण्यासंदर्भात अर्ज देण्यासाठी गेलो असता त्यांनी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. तुम्ही अर्जात तारीख वाढवून द्या असे देशमुख यांनी सुचवले. परंतु दोन दोन तीन वेळेस अर्ज देऊन देखील मला न्याय मिळाला नाही त्यामुळे मी कसा विश्वास ठेवणार असे शेतकऱ्यांनी सांगितले. देशमुख यांनी अर्ज स्वीकारला नाही.दुष्काळ परिस्थितीत आर्थिक भुदंड शोषित मला शीघ्र पोस्टाद्वारे तहसीलदार यांना अर्ज पाठविण्यास भाग पाडले. मला अनेक महिन्यांपासून महसूल प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने माझी शेतातील सोयाबीन पीक तसेच पडून असून यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. यामुळे मी वैफल्यग्रस्त झालो असून दि.२२ नोव्हेंबर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक सोयगाव येथे आत्मदहन करण्यावर ठाम असल्याचे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नातून साकार होणाऱ्या सोयगाव येथील शिवस्मारक भूमिपूजन सोहळ्यासाठी विधान परिषदेचे उपसभापती आमदार सचिन अहिर यांची दि. २२ रविवारी सोयगावात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेतकरी आत्महत्या करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. जीवित हानी झाल्यास महसूल व संबंधित अधिकारी कर्मचारी हे जबाबदार असतील असे तहसीलदार यांना पोस्टाने पाठविण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे तहसील कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी प्रशासनाशी संपर्क साधावा असे सुचविले होते. महसूलमंत्र्यांच्या सूचनेला सोयगाव महसूल कार्यालयाकडून तिलांजली दिली जात असल्याने वैफल्यग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी महसूल प्रशासन काय कारवाई करते याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *