दि.२२, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले

दि.२२, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, स्वराज्याची संकल्पना आणि रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले

 

तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

 

 

कार्य जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आणि आदर्श भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोयगाव येथे उभारण्यात येणारे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माननीय श्री. सचिन अहिर यांनी केले.

 

सोयगाव नगरपंचायतीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा भव्य भूमिपूजन सोहळा रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते, माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी, शिवकालीन पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

 

यावेळी बोलताना उपसभापती सचिन अहिर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करताना दाखविलेले धैर्य, दूरदृष्टी, शौर्य आणि रयतेप्रती असलेली बांधिलकी आजही आदर्शवत आहे. महिलांचा सन्मान, सर्वधर्मसमभाव आणि न्यायनिष्ठ राज्यकारभार ही त्यांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सोयगाव येथे त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आपल्या हस्ते होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. आमदार अब्दुल सत्तार हे मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासोबतच महापुरुषांच्या विचारांना सन्मान देणारी कामे करीत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

 

यावेळी आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, सोयगाव तालुक्याची १९५३ मध्ये स्थापना झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची मागणी जवळपास पन्नास वर्षांपासून होत होती. निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण पाठपुरावा केला. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांनी या प्रस्तावासाठी विशेष लक्ष घालून स्मारकासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.

 

आज भूमिपूजन झालेल्या स्मारकाचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते भव्य अनावरण सोहळा आयोजित करण्यात येईल. हे स्मारक सोयगावच्या वैभवात भर घालण्यासोबतच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठीही आकर्षणाचे आणि प्रेरणेचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवपार्क आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी आपण पुढाकार घेतला असून, दिवंगत माजी मंत्री स्वर्गीय बाबुराव काळे यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सोयगाव येथे त्यांचा पुतळा उभारण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

 

सोयगावच्या पर्यटन विकासासोबतच सिल्लोडच्या धर्तीवर सोयगाव शहरासाठी वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव मंजुरीच्या स्तरावर असल्याचे सांगत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार सत्तार यांनी स्पष्ट केले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी संयम राखून धैर्याने संकटाचा सामना करावा. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

——–

या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यामुळे सोयगावकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास येत असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा आणि विचारांचा वारसा जपणारे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

————-

 

————–

*आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीसह शिवसेनेचा आधार*

 

सोयगाव येथे आयोजित या कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील चार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शासकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली. तसेच शिवसेनेच्या वतीने या कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, कुटुंबातील मुलीला शिक्षणासाठी सायकल आणि जीवनावश्यक किराणा साहित्य देऊन त्यांना आधार देण्यात आला. संकटाच्या काळात शेतकरी

——

याप्रसंगी सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, सोयगाव च्या नगराध्यक्षा आशाबी तडवी, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. मनोज राठोड, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक नंदकिशोर सहारे, डॉ. दिनेश साळवे, दामू अण्णा गव्हाणे, सयाजीराव वाघ, युवा सेनाप्रमुख कुणाल राजपूत, शहरप्रमुख संतोष बोडखे, नगरपंचायतीतील शिवसेनेचे गटनेते अक्षय काळे, नगरसेवक शेख रऊफ, हर्षल काळे, राजू दुतोंडे, दीपक पगारे, संदीप सुरडकर, अक्षय इंगळे, कादिर शहा, नारायण घनगाव, गजानन कुडके, लतीफ शहा, भगवान जोहरे, संध्याताई मापारी, अशोक खेडकर, पंचायत समिती सदस्य सोपानदादा गवांडे, मुख्याधिकारी संभाजी देशमुख, प्रशांत शिरसागर, गोपीचंद जाधव, राजमल पवार, बाबू चव्हाण, सलीम पठाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी आणि एड.योगेश पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रभाकर आबा काळे यांनी तर शेवटी शहरप्रमुख संतोष बोडखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *