महागांव/पं. स.बांधकाम विभाग शाखा अभियंताचा धनी दहा वर्षांपासून एकाच खुर्चीवर
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
महागांव पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता प्रवीण सलामे तब्बल दहा वर्षां पासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याची बाब समोर आली असून, दहा वर्षाच्या कार्यकाळात प्रवीण सलामे विरोधात अनेक तक्रारीच्या विरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणती दखल चे पाऊले उचललेले नाही.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां कडे अनेक तक्रारी दाखल असतानाही जिल्हा प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, संबंधित शाखा अभियंता हप्ताभरातून अनेकदा “दौऱ्यावर” असल्याचे कारण देत मुख्यालयात अनुपस्थित दिसून येत आहे मात्र प्रत्यक्षात त्यांचा कारभार यवतमाळ व नागपूर येथूनच चालतो, अशी चर्चा पंचायत समितीच्या वर्तुळात आहे. या परिस्थितीत त्यांच्या हाताखालचे तीन खाजगी व्यक्ती बहुतांश कामकाज सांभाळत असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.
विशेष अनेक विकासकामांचे मोजमाप व तपासणी प्रत्यक्षात दुसऱ्या तीन खाजगी व्यक्तीकडून करून घेतले जाते, परंतु कागदोपत्री ते काम शाखा अभियंत्यांच्या नावावर दाखवले जाते, अशाही गंभीर तक्रारी त्यांच्या कार्यरथात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आढळून आल्या त्यामुळे महागाव तालुक्यातील ठेकेदारांना हा त्रास सहन करावा लागत आहे
दरम्यान, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल बांधकामांची नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी संबंधित शाखा अभियंत्याकडे असतानाही घरकुल लाभार्थ्यांना माहिती न देणे घरकुल बांधकामा कडे दुर्लक्ष करणे यवतमाळ येथे राहून काम पाहणे आदी शह अनेक ठिकाणी घरकुलांच्या कामां कडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः काळी दौलत खान येथील घरकुल योजने मध्ये व इतर मूलभूत सुविधां बाबत अनेक अडचणी असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी काळी दौलत खान येथे भेट दिली असता घरकुलांच्या कामातील त्रुटी आणि शाखा अभियंत्यांच्या कार्यपद्धती बाबत अनेक बाबी उघड झाल्याचे सांगितल्या जात आहे त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित शाखा अभियंत्याला घरकुल्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आणि जबाबदारीने कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून यात हलगर्जीपणा झाल्यास कारवाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे सांगितले या प्रकरणात गंभीर तुटी आढळल्या ने शाखा अभियंता वर निलंबनाची कार्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे मात्र शेवटच्या क्षणी निलंबना पासून वाचल्याची चर्चा पंचायत समितीच्या वर्तुळात सुरू आहे दरम्यान पंचायत समिती अंतर्गत झालेल्या तालुक्यातील विकास व कामाबाबत शाखा अभियंत्यांच्या वारंवार तक्रारी जिल्हा प्रशासना कडे होत असताना जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्या कडून शाखा अभियंत्यावर ठोस कारवाई न झाल्याने नागरिकां मध्ये नाराजी व्यक्त होत आहे कर्तव्यदक्ष असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाखा अभियंताला निलंबित करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
