मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील फरारी आरोपीला मुंबईतून बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मेफेड्रोन तस्करी प्रकरणातील फरारी आरोपीला मुंबईतून बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 

 

 

नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कळमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका फरारी आरोपीला मुंबईतील मालाड परिसरातून अटक केली आहे. 11/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंडखैरी नाक्याजवळ एका खासगी बसमधून 79.85 ग्रॅम मेफेड्रोन पावडर आणि इतर साहित्य असा एकूण 4,04,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी कळमेश्वर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता, परंतु आरोपी तेव्हापासून फरार होता.

पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मुंबईत असल्याची खात्री पटताच पथकाने मालाड येथे जाऊन त्याला 14/03/2026 रोजी ताब्यात घेतले. आरोपीकडून 16,000 रुपये किमतीचे दोन भ्रमणध्वनी जप्त करण्यात आले असून न्यायालयाने त्याला 17/03/2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कामगिरीमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *