पंचायत समिती सभागृह दुरुस्तीच्या कामात पंचायत समितीच्या शाखा अभियंत्यांचे ढवळाढवळ कारवाईची मागणी
यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर
महागांव शाखा अभियंता अधिकारी प्रवीण सलामे यांना कोणताही अधिकार नसतानाही पंचायत समिती सभागृह दुरुस्तीच्या कामात ढवळाढवळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या वादग्रस्त प्रकारामुळे संबंधित अभियंत्यावर तात्काळ कारवाई करून त्याची बदली अथवा निलंबन करण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.मिळालेल्या माहिती नुसार महागाव पंचायत समिती परिसरात असलेल्या पंचायत समिती सभागृह दुरुस्तीचे सुमारे पाच लाख रुपयाचे काम स्थानिक ठेकेदार अरबाज खान कयुम खान पठाण यांना नियमानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागा कडून मंजूर करण्यात आले होते संबंधित विभागाच्या देखरेखेखाली हे काम पूर्णही करण्यात आले आहे मात्र हे काम पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात नसताना आणि त्या कामाचे कोणतीही संबंध नसताना पंचायत समितीचे शाखा अभियंता प्रवीण सलामे यांनी स्वतःहून कामाची पाहणी करून त्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जात आहे बचत भवनाच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी व मूल्यांकन करणे हे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील वृषाली गुंजाळ प्रियंका गायकवाड अमोल आघम या अधिकृत अभियंताचे कर्तव्य असताना त्यांना बाजूला ठेवून सलामे यांनी स्वतःच पाहणी करून वाद निर्माण केल्याचे सांगितल्या जात आहे या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम उपविभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला या कामाची पाहणी करण्याचा कोणताही अधिकृत अधिकार नसल्याच्या स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे सलामे यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन कामात हस्तक्षेप केल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे यापूर्वी अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे धारेगाव येथील आदिवासी बहूबल असलेल्या वस्तीत करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे मूल्यांकन ही सलामे यांनी अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन केल्याचे सांगितले जाते त्यामुळे त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत या पार्श्वभूमीवर पंचायत समितीत हा प्रकार गंभीर मानला जात असून संबंधी शाखा अभियंत्याच्या कारभाराची चौकशी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिक ठेकेदार तसेच विविध स्तरातून करण्यात येत आहे पंचायत समितीतील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संबंधित अधिकाऱ्यावर कार्य होते की प्रकरण दडपले जाते याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे
