देह विठ्ठल श्वास विठ्ठल  आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल   ….. डाॅ.मधुसूदन घाणेकर

देह विठ्ठल श्वास विठ्ठल

आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल

….. डाॅ.मधुसूदन घाणेकर

 

 

पुणे : 10 जुलै 2026

” जो भक्त विठ्ठलाची निःसिम भक्ती करतो, निष्ठेने श्रध्देने विठ्ठलाचे स्मरण करतो,त्याला

आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही.विठुरायाच्या भक्तीने त्याला त्याच्या आयुष्याचे सार्थक झाल्याचे

समाधान मिळते.पंढरीच्या वारीत प्रत्येक वारकरी विठ्ठलमय होतो.

देह विठ्ठल श्वास विठ्ठल

आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल..अशी त्याची भक्तीभावतील समरसता होते” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि पहिल्या विश्व काव्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघातर्फे आयोजित पहिले जागतिक वारकरी कवी – काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर काव्य संमेलनाच्या

अध्यक्षीय भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते.संमेलनास सुमारे 150 वारकरी उपस्थित होते.काव्यसंमेलनाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मधुकर्णिका सासवडे

यांनी केले. पत्रकार संघाचे

संस्थापक-अध्यक्ष संतोष सागवेकर यांनी अतिथी स्वागत आणि आभार प्रदर्शन केले. श्रध्दा देवळे यांनी संयोजन केले. वारीतील 36 मान्यवर कवी कवयित्रींना डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि संतोष सागवेकर यांच्या शुभहस्ते विठु माऊली

पुरस्कार प्रदान करण्यात आले. जागतिक वारकरी काव्यसंमेलनाचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित ‘डहाळी ‘ ह्या विश्वविक्रमी अनितकालिकाच्या 1144व्या

विशेष अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

वारक-यांनी

कवितांसह भक्तीगीते, भजने

सादर केली.तसेच काही वारक-यांनी वारीतील अनुभूतिही व्यक्त केली. वारक-यांच्या कवितेतून, भजनातून ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकारामाच्या अभंगांची प्रचिती आली.

या कार्यक्रमास ज्येष्ठ कवयित्री अनघा सावनूर

व पिंपरी चिंचवड भागातील उद्योजक अभय भोर , डॉ उतमराव मांढरे व इतर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . सदर काव्यसंमेलनात दिंडीतील वारक-यां शिवाय सुनंदा कुलकर्णी, पद्मा वेदपाठक, बाबा ठाकूर आदिंच्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कामगार व शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल राजे पवार यांना विठू माऊली कामगार रत्न पुरस्कार 2026ने , कुमारी दुर्गा अभय भोर संस्थापक अध्यक्ष – दुर्गा ब्रिगेड संघटना व

राष्ट्रीय अध्यक्षा – दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष.अध्यक्षा – महिला लघुउद्योजक संघटना यांना विठू माऊली रणरागिणी पुरस्कार 2026 ने,,

पत्रकारी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल विठू माऊली ज्ञानदान पुरस्कार 2026 ने जेष्ठ पत्रकार व युनआयचे पश्चिम महाराष्ट्राचे ब्युरो चीफ प्रकाश पांडे, पुढारी पिंपरी चिंचवड वृत्त समुहाचे जेष्ठ पत्रकार संतोष महामुनी, पिंपरी चिंचवड प्रभात वृत्त समुहाच्या जेष्ठ महिला पत्रकार संगिता पाचंगे , जेष्ठ महिला पत्रकार मंजुषा आवळकंठे , आदी विविध वृत्तपत्र समृहांत कार्यरत असणाऱ्या विठू माऊली ज्ञानदान पुरस्कार 2026 या पुस्तकाने गौरविण्यात आले.तसेच विठू माऊली युवा पत्रकार पुरस्कार 2026 ने गणेश कदम,सागर काळे यांना ही गौरविण्यात आले.

प्रसिध्दी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विठू माऊली ज्ञानदान पुरस्कार 2026 आशुतोष भोसले यांना गौरविण्यात आले. आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विठू माऊली युवा उद्योजक 2026 पुरस्काराने आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे घाणेश विटकर यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विठू माऊली उद्योगरत्न 2026 पुरस्काराने गौरविण्यात आले.

अश्या रितीने परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शताब्दी 2027 वर्षानिमित्त (औवचित्य साधून), परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्यिक कट्टा आयोजित पहिले जागतिक वारकरी कवी – काव्य संमेलन अंतर्गत *विठू माऊली पुरस्कार 2026* ची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली.

या परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पहिल्या जागतिक वारकरी कवी – काव्य संमेलनात वारकरी सांप्रदायाच्या माऊलींनी सहभागी होऊन पहिल्या जागतिक वारकरी कवी संमेलन, अंतर्गत *विठू माऊली पुरस्कार 2026* यशस्वी करण्यासाठी व वारकरी माऊलींना पुरस्काराने गौरविण्यात आले…

वारकरी माऊली अर्चना केदारी पाटील, माऊली सिमाबाई कांबळे, माऊली सुनंदाताई कुलकर्णी, माऊली पद्माताई पाटील, माऊली सरोजिनीताई पाटील, माऊली वासंतीताई पाटील,

माऊली सदाशिव सोनाबा पाटील, माऊली अक्षय भिमराव बेडकर, माऊली द्रोपदाताई सुतार, माऊली सुलाबाई पाटील, माऊली आनंदाताई चांदणे,अनिल सोकासने, माऊली संजय मारुती सावंत, माऊली शिवाजी कऱ्याप्पा धनगर, माऊली विठ्ठल हिंदूराव शिंदे, माऊली गणेश फाटे, माऊली सदाशिव पाटील, माऊली चंद्रकांत सुतार, माऊली गणपती पाटील , माऊली प्रदिप आमटे व इतर आदी वारकरी सांप्रदायाचे माऊलींनी परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शताब्दी 2027 वर्षानिमित्त ,परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्यिक कट्टा आयोजित

पहिले जागतिक वारकरी कवी – काव्य संमेलन 2026 चे मोठ्या उत्साही भक्तीमय वातावरण संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *