अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर. जुन्या नळधारकांना नविन जोडणी मोफत द्या.
वानाडोंगरी ग्राहक पंचायतचे निवेदन.
हिंगणा- वानाडोंगरी नगरपरिषद परिसरातील जनतेला नवीन नळ योजनेचे नवीन कनेक्शन देण्यात येणार आहे. त्यासाठी वानाडोंगरी शहरातील सर्व नळजोडणी घेणाऱ्या ग्राहकांना ठरवलेली रक्कम नगरपरिषद कार्यालयात अर्जासह भरावी लागणार आहे. वानाडोंगरी नगरपरिषद परिसरातील नविन नळजोडणी घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी 6000 रुपये भरावे लागणार आहे तर ज्यांनी ग्रामपंचायत असतानाच नळजोडणी घेतलेली आहे. आणि दरवर्षी पाणिकर सुद्धा सातत्याने भरत आहेत. अशा जुन्या नळधारकासाठी सुद्धा नगरपरिषद कार्यालयाने 5500 रुपये घेण्याचे ठरविलेले आहे. तेव्हा हा जुन्या नळ ग्राहकावर फार मोठा आर्थिक अन्याय आहे. गोरगरीब जनता जी दररोज हातावर आणून पानावर खातात अशांनी एवढी मोठी रक्कम कसे काय भरायचे आणि कुठून आणायचे. तेव्हा जुन्या नळ ग्राहकांना मोफत नळ कनेक्शन देण्यात यावे अशी मागणी वानाडोंगरी शहर ग्राहक पंचायत च्या वतीने नगराध्यक्ष सुनंदाताई बागडे यांना निवेदना द्वारे करण्यात आलेली आहे. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे नागपूर जिल्हा मार्गदर्शक विनायक इंगळे गुरुजी, वानाडोंगरी शहराध्यक्ष अरुण कैकाडे, ग्राहक पंचायतचे पदाधिकारी सतीश सातपुते,राहुल देवगिरकर व भुणेश ठाकरे हे उपस्थित होते. तसेच नगराध्यक्षा सुनंदाताई बागडे यांना निवेदन देताना वानाडोंगरी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता,दक्षता समिती सदस्य संतोष कानेरकर, सामाजिक कार्यकर्ते देवचंद काळे व राहुल बागडे उपस्थित होते.
