श्री अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तीमय सांगता; काल्याचे कीर्तन उत्साहात संपन्न

श्री अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तीमय सांगता; काल्याचे कीर्तन उत्साहात संपन्न

 

 

यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर

 

महागाव येथील जुने हनुमान मंदिरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या श्री अखंड हरिनाम सप्ताहाची आज गुरुवार, दि. २६ रोजी भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. रामनवमी निमित्त आयोजित या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ह.भ.प. विष्णुदास महाराज वाशिमकर यांचे काल्याचे कीर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला महिला, बालगोपाल, पुरुष मंडळी तसेच भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहात दररोज काकड आरती, कीर्तन व नित्य नियमांचे पालन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्याला थानेदार धनराज निळे व तहसीलदार अभय म्हस्के उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला.

भक्ती, नामस्मरण आणि सामूहिक साधनेचा सुंदर संगम असलेल्या या सप्ताहाची सांगता भक्तांच्या समाधानाने आणि आनंदमय वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *