शहरासह तालुक्यात महिलांनी भक्तिभावाने व धार्मिक वातावरणात केले हरतालिका व्रत पूजन  तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

शहरासह तालुक्यात महिलांनी भक्तिभावाने व धार्मिक वातावरणात केले हरतालिका व्रत पूजन

तालुका सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

सोयगाव, दि. १४ — शहरासह सोयगाव तालुक्यातील महिलांनी सोमवारी भक्तिभावाने हरतालिका पूजन केले. यावेळी पद्माबाई शिंदे व शारदा इंगळे यांनी हरतालिकेची पोथी वाचून व्रताचे धार्मिक महत्त्व उपस्थित महिलांना सांगितले.हरतालिका हे हिंदू धर्मातील महिला व कुमारिकांसाठी महत्त्वाचे धार्मिक व्रत मानले जाते. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्यासाठी, तर कुमारिका मनासारखा जीवनसाथी मिळावा यासाठी हे व्रत करतात. पौराणिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्या स्मरणार्थ हे व्रत केले जाते.पूजनासाठी सरूबाई इंगळे, दिप्ती पाटील, छायाबाई पवार,सुनीता गव्हाणे,योगिता पाटील, मालताबाई गव्हाणे, मंगलाबाई इंगळे,भाग्यश्री गव्हाणे,अश्विनी पाटील, सरला इंगळे, शारदाबाई लवटे, मालुबाई लवटे, लताबाई इंगळे, सिद्धी गव्हाणे, रीना इंगळे, अनुसयाबाई लवटे, माधुरी लवटे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *