पेट्रोल– डिझेल बाबत प्रशासनाचे आवाहन गरजेपुरतेच इंधन

पेट्रोल– डिझेल बाबत प्रशासनाचे आवाहन गरजेपुरतेच इंधन मिळणार अनावश्यक गर्दी टाळावी तहसीलदार अभय मस्के यांचा इशारा

 

 

 

यवतमाळ प्रतिनिधी एस के शब्बीर

 

 

सध्या शासनाकडून किंवा तेल कंपन्याकडून पेट्रोल व डिझेल तुटवडा असल्याबाबत अथवा पुरवठा खंडित होणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही तरी महागाव तालुक्यातील नागरिकांनी कोणत्याही अपावर विश्वास ठेवू नये व अनावश्यक पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असा प्रकारच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे तहसीलदार अभय मस्के यांचा इशारा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उमरखेड ढाणकी महागाव आर्णी दारव्हा नेर बाबुळगाव कळंब वनी राळेगाव घाटंजी यवतमाळ या तालुक्यातील समाज माध्यमांवर पेट्रोल व डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा ची लाट पसरल्यामुळे महागाव शहरातील काही पेट्रोल पंपांवर बुधवार दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर वाहनधारकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनधारकांनी खबरदारी म्हणून आपल्या वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने काही ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले समाज माध्यमांवर पसरत असलेल्या अफवांम5 नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळासाठी पेट्रोल पंप परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली मात्र, महागाव तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नसून पुरवठा निमित सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तहसील प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे संदेश पाठविला

पेट्रोल व डिझेल हे ज्वलनशील पदार्थ असल्याने त्याची घरामध्ये साठवणूआ धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गरजेपुरतेच इंधन घ्यावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी,

अशा प्रकारच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जबाबदार नागरिक म्हणून संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे.

 

तहसीलदार अभय मस्के महागांव यांचा एक संदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *