अमृत पॅटर्न चा डंका समुद्रापार ईटालीयन शेती तज्ञांची कापूस प्लाटला भेट

अमृत पॅटर्न चा डंका समुद्रापार

ईटालीयन शेती तज्ञांची कापूस प्लाटला भेट

 

 

 

जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव

 

 

 

यवतमाळ जिल्ह्याची ओळख अख्या जगात शेतकरी आत्महत्याग्रस्त जील्हा म्हणुन झालेली ओळख व महाराष्ट्र राज्यातील कापुस उत्पादक जील्हा म्हणुन मागील अनेक दशके आसलेली ओळख आज अमृत पॅटर्न च्या यशस्वी घोडदौड मुळे समुद्रापार गेल्याने महागाव तालुक्यातील एक छोट गाव अंबोडा आणि या गावातील एक प्रयोगशील ध्येयवेडा शेतकरी म्हणजे अमृत पॅटर्न चे जनक अमृतराव देशमुख मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून आपल्या शेतात कापुस, सोयाबीन,चणा,ऊस अशा विविध पिकावर यशस्वी प्रयोगशीलता जपत त्यांनी सतत स्वताचे व ईतर नामांकित विद्यापीठांमध्ये कार्यरत आसलेल्या शेती संशोधकाचे एकरी ऊत्पादनाचे सर्व रेकार्ड मोडले आहेत विशेष म्हणजे दरवर्षी ऊत्पादनाचा आलेख चढता क्रम असल्याने राज्यातील व राज्याबाहेरील लाखो शेतकरी, पदाधिकारी शेती शास्त्रज्ञ इत्यादींनी त्यांच्या शेताला भेटी दिल्या आहेत व याची देही,याची डोळा स्वतः अनुभव घ्यावा या म्हणीचा प्रत्यय घेऊन अनेकांनी त्यांच्या पद्धतीने व मार्गदर्शन घेऊन आपल्या ऊत्पादनात भरीव अशी वाढ केली आहे यांची शेती ही शेती नसुन एक प्रयोगशाळा बनली आहे चीलगव्हान येथील साहेबराव करपे यांची देशातील पहीली सहकुटुंब शेतकरी आत्महत्या याच शिवारात झाली होती हे या ठिकाणी विशेषत्वाने नमुद करावे लागेल आणि आज याच शिवारात शेतकर्याना आत्महत्या करण्यापासुन वाचवण्यासाठी याच शिवारातील अमृतराव देशमुख यांचा यशस्वी प्रयोग गगन भरारी घेतो आहे हा दुर्मिळ योगायोग समजावा की, नैसर्गिक चमत्कार कुठलीही अनुकुल परीस्थिती नसतांना एकरी 40क्वीटंल कापुस,20क्वी सोयाबीन, चणा एकरी 18 क्विंटल,उस एकरी 85टण ही साधारण बाब नाही आच मार्च च्या शेवटी सर्व राज्यातील कापुस हंगाम आटोपला पंरतु देशमुख यांच्या शेतातील कापुस भरावर आहे आणि आजुन दोन महिने ऊनंगवाडी होणार नाही त्यामुळे कपाशी पिक हे हंगामी नसुन वार्षिक आसल्याचे सीध्द होत आहे ही यशस्वी प्रयोगशीलता समुद्रापार गेल्याने ईटली या देशातील एक टिम मागील पंधरवड्यात भेट देऊन माहिती घेऊन गेली व देशमुख यांना ईटली दौऱ्यावर येण्यास विनंती केली यात प्रामुख्याने नुरीना,फ्रान्सको,लुरो हे ईटालीचे शेती तज्ञ होते तर त्यांचे सहकारी मुंबई येथील राज हे सुद्धा होते कपाशी प्लाट बघुन आश्चर्यचकित झाले यावेळी स्थानिक चे बाळुपाटील दुपात्रे,सतीष ठाकरे,व अमृत पॅटर्न चे जनक अमृतराव देशमुख व संचालक दिनेश देशमुख सुध्दा उपस्थित राहुन सवीस्तर मार्गदर्शन केले यानंतर अमेरीकन कापुस संशोधक सुध्दा प्लाटला भेट देण्यासाठी येणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले अमृतराव देशमुख यांच्या यशस्वी प्रयोगशीलतेची कहानी विदेशातील तज्ञापर्यतं जाऊन पोहचली आणि तीथुन इथपर्यंत माहीती घेण्यासाठी येतात पंरतु आपल्या देशातील व राज्यातील शासनाला किवां शास्त्रज्ञ इत्यादींना वेळ नाही किंवा ईच्छशत्की नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल

गोविंदराव देशमुख सवनेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *