उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक हद्दीत अवैध रेती वाहतूक सुरूच….!!!!
नागपूर:- दिनांक 17 मार्च 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक, पोलीस स्टेशन रामटेक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली असता अवैधरित्या विनापरवाना रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद पोलीस पथकाने रेती तस्करांवर साधला बुलडोझर ही कारवाई नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक दोन कारवाई पोलीस स्टेशन रामटेक कारवाई एक, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर चार कारवाई अशा एकूण सात कारवाई करून सात गुन्हे रामटेक पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा पथक रामटेक परिसरात ग्रस्त घातल्याची माहिती मिळतात रामटेक उपविभाग व रामटेक पोलीस यांनी कारवाई केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक यांची कामगिरी नुसतं नावाला दिसून येतोय, रामटेक उपविभाग यांनी त्यांच्या पथकासह तुमसर ते रामटेक राखी तलावाजवळ नाकाबंदी करून पेट्रोलिंग केली असता वाहन क्रमांक ट्रक क्रमांक एम एच 36 ए बी 0944 हे वाहन मिळून आले. नमूद वाहनाच्या चालक नामे किशोर नीलकंठ सूर्यवंशी वय 35 वर्ष राहणार शिवनी भोंडकी तालुका रामटेक, जिल्हा नागपूर, हा अवैधरित्या बारा ब्रास रेती वाहतूक करीतांना मिळून आला. वाहन मालक आरोपी क्रमांक दोन आशिष पटले राहणार डोंगरला तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांच्या सांगण्यावरून पाटील टोला घाट पोलीस स्टेशन तिरोडा व तहसील कार्यालय तिरोडा या हधीतून तालुका तिरोडा जिल्हा गोंदिया येथून अवैधरित्या रेती आणल्याची माहिती प्राप्त झाली. वाहन क्रमांक दोन टिप्पर क्रमांक एम एच 40 सिटी 92 68 हे वाहन मिळून आले. नमूद वाहनाच्या चालक नामे ईश्वर पुंडलिक गोटेफोडे वय 32 वर्ष राहणार बोरी तालुका तुमसर जिल्हा भंडारा, हा अवैधरित्या पंधरा ब्रास रेती वाहतूक करितांना मिळून आला. वाहन मालक आरोपी क्रमांक दोन नेहाल खोब्रागडे तुमसर तहसील कार्यालय तुमसर जिल्हा भंडारा यांच्या सांगण्यावरून पाटीलघाट पोलीस स्टेशन तिरोडा व पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया या हदीतून अवैधरित्या रेती आणल्याची माहिती प्राप्त झाली. नमूद आरोपींना रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नाही. रामटेक पोलिसांनी पंचा समक्ष वर नमूद दोन वाहने किमती 1 करोड दहा लाख रुपये आणि एकूण 27 ब्रास रेती किमती एक लाख 35 हजार रुपये असा एकूण एक करोड अकरा लाख 35 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रामटेक पोलीस व उपविभागीय पोलीस रामटेक यांना स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करिता येत असल्याची भनक लागताच रामटेक उपविभागीय पोलीस कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.
स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कामगिरी….!! स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथकाने तुमसर ते रामटेक रोडवरील नगरधन फाटा, राखी तलावाजवळ तसेच शितलवाडी परिसरात नाकाबंदी करून पेट्रोलिंग करून वाहने तपासली असता वाहन क्रमांक एक टाटा कंपनीचे 12 चक्का टिप्पर एम. एच. 40 सि.टी 84 32 हे वाहन मिळून आले वाहनाच्या चालक नामे श्री. लखन सुक्राम पारधी वय 36 वर्ष राहणार सिहरी, तालुका मोहाडी जिल्हा भंडारा हा अवैधरित्या दाहा ब्रास रेती वाहतूक करीत असताना मिळून आला. वाहन क्रमांक दोन टाटा कंपनीच्या 12 चक्का टिप्पर एम.एच 49 बी.झेड. 7249 हे वाहन मिळून आले. नमूद वाहनाचा चालक नामे चंद्रकुमार आनंदराव पुंडे वय 40 वर्ष राहणार नवेगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा, हा अवैध रीत्या 10 ब्रास रेती वाहतूक करीत असताना मिळून आला. वाहन क्रमांक तीन टाटा हायवा एम.एच 40 सी.वाय. 1819 हे वाहन मिळून आले. नमूद वाहनाचे चालक नामे कैलास गजानन ढोरे वय 27 वर्ष, राहणार सराखा बोर्डा, तालुका रामटेक,जिल्हा नागपूर हा अवैधरित्या दहा ब्रास रेती वाहतूक करताना मिळून आला. तसेच वाहन क्रमांक चार टाटा हायवा क्रमांक एम.एच. 40 सी.टी 1819 हे वाहन मिळून आले. नमूद वाहनाच चालक नामे आकाश नारायण राऊत वय 28 वर्षे राहणार हरदोली तालुका तुमसर, जिल्हा भंडारा, हा अवैधरित्या दहा ब्रास रेती वाहतूक करीत असताना मिळून आला. आरोपिना रेती वाहतुकीच्या परवाना बाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहिती प्राप्त झाली. तसेच सदर रेती ही पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया पोलीस स्टेशन तहसील कार्यालय तिरोडा येथील पाटील टोलाघाट तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया येथून तिरोडा मार्गावरून तुमसर मोहाडी पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय तसेच आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतून अवैध रेती वाहतूक रामटेक व्हाया नागपूर रात्रंदिवस वाहतूक होत असतो, पोलिसांनी पंचा समक्ष वरील नमूद चार वाहने किंमत दोन कोटी रुपये आणि एकूण 40 ब्रास रेती किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन कोटी दोन लाख रुपयांच्या मुद्देमाल नागपूर जिल्हा ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखा टीमने जप्त केला.
पोलीस स्टेशन रामटेक यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून कुंभकर्णी झोपेत दिसून येतोय. पोलीस स्टेशन रामटेक यांची कामगिरी रामटेक पोलिसांनी तुमसर ते रामटेक मार्गावर पेट्रोलिंग केली असता राखी तलावाजवळ अशोक लेलँड कंपनीच्या 12 चक्का टिप्पर क्रमांक एम एच 40 सिटी 96 35 हे वाहन मिळून आले. या वाहनाच्या चालक आरोपी क्रमांक एक राकेश रमाकांत मेश्राम वय 32 वर्षे राहणार सालई खुर्द तालुका मोहाडी जिल्हा भंडारा हा अवैधरित्या दाहा ब्रास रेती वाहतूक करताना मिळून आला. वाहन मालक आरोपी क्रमांक दोन मनोज नागोराव शेंडे, राहणार परसवाडा, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा यांच्या सांगण्यावरून लोभी घाट गोंदिया येथून अवैध रित्या रेती आणल्याची माहिती प्राप्त झाली. आरोपीला रेती वाहतुकीच्या परवाण्याबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी पंचा समक्ष वर नमूद वाहन किंमत 35 लाख रुपये आणि एकूण दहा ब्रास रेती असा ऐकून 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया श्री प्रजित नायर व पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे साहेब यांच्या हदीतून अवैध रेती वाहतूक भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी सावंत कुमार तसेच पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब या हदीतून अवैद्य रेतीची वाहतूक मोहाडी तुमसर व आंधळगाव या पोलीस स्टेशन रामटेक पोलीस स्टेशन वाया नागपूर या मार्गे दररोज वाहतूक होत असतो, येथील स्थानिक पोलीस अधीक्षक भंडारा गोंदिया यांनाच का म्हणून दिसत नाही. भंडारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी काही स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाई करिता नमूद करण्यात आलेले असून तेथील पथक मूक गिळून गप्प का….?? असा सवाल तालुक्याला नाहीतर जील्हाला चव्हाट्यावर जोमात सुरू आहे.काही स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुपर एंट्री येथे व्यस्त असल्याचे तालुक्याला बोलले जात आहेत..
ही कारवाई 77 ब्रास रेती सह सात वाहने असा ऐकून तीन कोटी 48 लाख 95 हजार रुपयांच मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद वाहन मालक आणि चालक यांच्याविरुद्ध रामटेक पोलीस स्टेशन येथे कलम 303(2),49 भा. न्या. स.सहकलम 48(7),48(8), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम 4 ,21 खान खनिज अधिनियम, सहकलम तीन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम, सह कलम मोवाका अन्वये 7 गुन्हे रामटेक पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले.
ही कामगिरी नागपुर जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधिकक्षक श्री.हर्ष पोद्दार साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनिल मस्के साहेब यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलिस यांनी ही कामगिरी बजावली..
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
