समर कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलागुणाची ज्ञान होणे गरजेचे… रेखा नेवे

समर कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलागुणाची ज्ञान होणे गरजेचे… रेखा नेवे

 

अमर संस्था संचलित परमपूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडी येथे समर कॅम्प आयोजित करून आज त्याचा समारोप करण्यात आला दहा दिवसाच्या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यात बालवाडीतील विद्यार्थ्यांना कबड्डी खो-खो लांब उडी स्विमिंग मल्लखांब ड्रॉईंग गाणे नृत्य शुद्धलेखन यांसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या व शिकवण्यात आल्या आज समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लिश मीडियम स्कूल दुपार विभागाचे मुख्याध्यापक कमलाकर पाटील अमर संस्थेचे व्यवस्थापक आर डी पाटील परमपूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडीच्या मुख्याध्यापिका रेखा नेवे हे उपस्थित होते.

मुख्याध्यापिका रेखा नेवे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की समर कॅम्पच्या माध्यमातून शालेय शिक्षणाच्या अतिरिक्त समर घेऊन त्यांना विविध खेळांची ज्ञान असणे गरजेचे असते या समर कॅमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना विविध गोष्टी शिकवण्यात आले असे त्यांनी सांगितले यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले व

मान्यवरांनी दीपप्रज्वलां नंतर सरस्वती पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वर्गात आकाशगंगा या गाण्यावर नृत्य सादर केले व काही विद्यार्थ्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.समर कॅम्प कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना सरबत,टरबूज असे वेगवेगळे पदार्थ रोज देण्यात आले.योगासन शिकवण्यासाठी कैलास पाटील मल्लखांब शिकवण्यासाठी ललित सोनवणे क्राफ्ट व ड्रॉइंग शिकवण्यासाठी कुवर तसेच परम पूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडी शिक्षक वृंद शिपाई यांनी परिश्रम घेतले

 

 

विश्वास वाडे प्रतिनिधी चोपडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *