करडी पोलिसांची मोठी कारवाई: एकूण ६८ हजारांच्या मुद्देमालासह अवैध दारू तस्करास अटक
भंडारा:
जिल्ह्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंढरी (बु.) परिसरात छापा टाकून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून मोटर सायकलसह एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई मेश्राम यांना मुंढरी येथे अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून आरोपी ईश्वर अशोक मारबते (वय ३५ वर्ष, रा. मुंढरी बुता. मोहाडी) याला ताब्यात घेतले.
मोहा फुलांची दारू: २० लिटरच्या २ प्लास्टिक डबक्यांमध्ये एकूण ४० लिटर हातभट्टी दारू (किंमत ८,००० रुपये).
गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची HF डीलक्स मोटर सायकल (क्रमांक MH 36 Y 9505, किंमत ६०,००० रुपये).
असा एकूण ६८,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला.
आरोपीविरुद्ध करडी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १७९/२०२६ नुसार, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे आणि स.पो.नि. नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.शि. मेश्राम व पो.शि. धुळसे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास करडी पोलीस करत आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
