पाचगाव पोलिसांची मोठी कारवाई: जुगार अड्ड्यावर धाड, ७ आरोपींसह ३.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पाचगाव:
अवैध धंद्यांविरुद्ध कडक मोहीम राबवत पाचगाव पोलिसांनी मौजा धामना शिवारात सुरू असलेल्या ५२ ताशपत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण ३ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२१ जून २०२६ रोजी पाचगाव पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली की, धामना शिवारातील सेंट पॉल शाळेसमोरील नाल्याशेजारी असलेल्या एका रिकाम्या ले-आउटमध्ये काही लोक जुगार खेळत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी काही इसम झाडीझुडपांच्या आडोशाला ५२ ताशपत्त्यांवर जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून खालील ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे:
१. अब्दुल फहीम अब्दुल रहमान (वय ३७, रा. बडा ताजबाग, नागपूर)
२. सज्जाद हुसैन सरफराज हुसैन (वय २२, रा. अयोध्या नगर, नागपूर)
३. शाकीर करीम शेख (वय ३३, रा. कळमेश्वर)
४. शेख तब्बू शेख रहीम (वय २८, रा. ताजबाग, नागपूर)
५. अब्दुल मोहीम अब्दुल जब्बार (वय २२, रा. बडा ताजबाग, नागपूर)
६. मोहम्मद शाहरूख मोहम्मद हुसैन (वय २८, रा. बडा ताजबाग, नागपूर)
७. रमीज बेग युसुफ बेग (वय ३४, रा. बडा ताजबाग, नागपूर)
जप्त केलेला मुद्देमाल:
रोख रक्कम: ४,२०० रुपये.
वाहने: ३ लाख ८३ हजार रुपये किमतीच्या ६ मोटारसायकल.
इतर: ५२ ताशपत्त्यांचा संच.
एकूण ३,८७,२०० रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये सर्व ०७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम, कलम १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.
नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
