श्री संचारेश्वर विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त हर्षोल्हासात बाल दिंडीचे आयोजन

*श्री संचारेश्वर विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त हर्षोल्हासात बाल दिंडीचे आयोजन


*

 

प्रतिनिधी. मनोज टाक

 

दिनांक २५/०७/२०२७ वार शनिवार रोजी संस्कार केंद्रात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची वारकरी वेशभूषेत ‘बाल दिंडीचे ‘ आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते, महालिंगआप्पा कुरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभले किरण नाईक , संपदा देशपांडे.

 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजनाने झाली. तसेच महालिंग अप्पा कुरे यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठलाचे पूजन,आरती करण्यात आली.

 

कार्यक्रमाची प्रस्तावना किरण नाईक यांनी केली तर माझा भारत…बलशाली हा माझा भारत.. हे पद्य आपल्या सुमधुर आवाजात दिपालीताई देशपांडे यांनी सादर केले. काही विद्यार्थ्यांनी गवळण,अभंग याचे सुंदर सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या संपदाताई देशपांडे यांनी आपल्या प्रभावी वाणीतून विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी चे महत्व सांगितले. संतांची शिकवण, आचरण त्यांचे कार्य आजही आपल्या समाजाला उन्नत करण्यासाठी मार्गदर्शक ठरते हे सांगितले.

बालदिंडीत इयत्ता पहिली ते सातवी तसेच आठवी, नववी चे विद्यार्थी सहभागी होते.विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी, विविध संत, वारकरी यांची सुंदर वेशभूषा केली होती.

टाळ चिपळ्या,पताका हाती घेऊन वारकरी वेशभूषेत पावली खेळत विठ्ठल मंदिरापर्यंत बालदिंडी विठ्ठल नामाचा जयघोष करत निघाली.

सर्व विद्यार्थ्यांना राजगिऱ्याच्या लाडूचे खाऊ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार रुपाली सोनसळे यांनी केले तर सूत्रसंचालन बाळासाहेब ठोंबरे यांनी केले.

आषाढी एकादशीच्या कार्यक्रमास स्थानिक संस्कार केंद्राचे सन्माननीय पदाधिकारी, संस्कार केंद्राच्या मुख्याध्यापिका यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व पालकवृंद, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *