करिअर कट्टा अंतर्गत इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
अ. र. भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट् माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र (MITSC) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विद्यार्थ्यांचा इंडक्शन (ओरिएंटेशन) कार्यक्रम प्राचार्य प्रा. जी बी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करिअर कट्टा उपक्रमाची उद्दिष्टे, विविध कौशल्यविकास अभ्यासक्रम, करिअर संसद, नेतृत्व विकास, उद्योजकता, रोजगाराभिमुख संधी तसेच वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात करिअर कट्टा समन्वयक डॉ. योगिता चौधरी यांनी करिअर कट्टा उपक्रमाचे सविस्तर ppt सादरीकरण करून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच करिअर संसद, विविध कौशल्याधारित कोर्सेस, व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग-संपर्क व उद्योजकता या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरसाठी सक्षम बनविण्याचा उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रसंगी उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ अमर जावळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. दिनेश पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुजाता पाटील, सहअधिकारी डॉ. रोहिदास गवारे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागप्रमुख डॉ. भूषण पाटील, डॉ. अजिनाथ जिवरग, क्रीडा अधिकारी डॉ. महेश पाटील, प्रा मुकेश पाटील तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, करिअर संसद पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करिअर कट्टा उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व, नेतृत्वगुण, कौशल्ये व रोजगारक्षमता विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
