*न्यू माॅडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे काॅसमाॅटिक व ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्समधील गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे आज दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी काॅसमाॅटिक व ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्सच्या गुणवंत विद्यार्थ्यींनींना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात येऊन सत्कार करण्यात आला.
या कोर्सला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यींनींचा प्रतिसाद मिळाला. या विधार्थ्यींनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा म्हणून महाविद्यालयातील प्रा. स्नेहा शिर्के, प्रा. ऊषा किरवले, प्रा. अलका करंडे यांनी परिश्रम घेतले. या काॅसमाॅटिक व ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्सला एकूण 80 विद्यार्थ्यींनींनी सहभाग नोंदविला होता. हा काॅसमाॅटिक व ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्स श्रीमती वंदना पाटील, श्रीमती आरती पाटील लातूर तसेच मेकअप आर्टिस्ट
श्रीमती उषा डांगे, श्रीमती रमा चणेकर पुणे यांनी एकूण 30 तास घेऊन हा कोर्स पूर्ण केला होता. या काॅसमाॅटिक व ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्समध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यींनी आज स्वतः चा छान मेकअप, आपल्या घरातील नातेवाईक व बाहेरील मेकअप ऑर्डर घेत आहेत. आम्हाला या काॅसमाॅटिक व ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्सचा खूप फायदा झाला आहे असे काही काॅसमाॅटिक व ब्युटी पार्लर प्रशिक्षण कोर्स केलेल्या कु. भूमिका राठोड, कु. राजश्री
जगताप, कु. दिव्या घोडके, व कु. वैष्णवी पायघन, कु. रोशनी चव्हाण या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. ए. एम. कदम, डॉ. सुभाष मापारी, डॉ. संभाजी चौतमल, डॉ. वाय. एम. काशिदे, प्रा. विजय कांबळे, प्रा. रजत सातपुते, प्रा. सुभाष चव्हाण, प्रा. श्याम खर्जुले इत्यादी उपस्थित होते.
