समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठा गौरींचे शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पूजन व महानैवेद्य अर्पण

समृद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठा गौरींचे शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पूजन व महानैवेद्य अर्पण —

 

तालुका सायगाव प्रतिनिधी संतोष गर्दे

 

सोयगाव दि.१८– गणरायाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरींचे अर्थात महालक्ष्मीचे दि. १७ गुरुवारी शहरासह तालुक्यात आगमन झाले. दरम्यान दि.१८ शुक्रवारी महालक्ष्मी गौरींचे भक्ती भावाने पूजन करून महानैवेद्य अर्पण करण्यात आला. शनिवारी गौरी पूजन विसर्जन होईल. विशेष म्हणजे हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो.

भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आवाहन केले जाते. पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असते. परंपरेनुसार हा उत्सव साजरा केला जातो. काही कुटुंबांमध्ये धान्यावर बसलेल्या तर काहींकडे उभ्या महालक्ष्मीला दागिने तसेच मुखवटे घालून सजावट करण्यात येत असते. त्यांना विविध श्रृंगार करून सजविले जाते.

कुटुंबात लक्ष्मीचा वास राहून सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी घरात नांदावी यासाठी गौरीपूजन, अर्चन करण्यात येते. ज्येष्ठा नक्षत्रावर केवडा, पडवळ, कमळाचे फूल, सोळा प्रकारची पत्री, विविध पुष्पांनी लक्ष्मीचे पूजन करण्यात येते. पुरणपोळी, लाडू, करंजी, सोळा प्रकारच्या भाज्या, अनारसे सांजोरी यासह अन्य पंचपक्वान्नांचा महानैवेद्य देवीला अर्पण करण्यात येतो. महालक्ष्मी गौरी पूजन निमित्त कुटुंब एकत्रित येऊन देवीची सेवा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *