वेदांत आश्रमात पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ; आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते उद्घाटन*

*वेदांत आश्रमात पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ; आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते उद्घाटन*

 

 

विकासकामांबाबत दिलेला शब्द कृतीत उतरविण्याची परंपरा कायम ठेवत मेहकर-लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थजी खरात यांनी सुलतानपूर येथील वेदांत आश्रमातील भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या निधीतून आश्रम परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

वेदांत आश्रमात दररोज तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मात्र पावसाळ्यात संपूर्ण परिसर चिखलमय होत असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक कार्यकर्ते , बंडूभाऊ जोगदंड शिवसेना शहराध्यक्ष उबाठा, कैलासभाऊ हरकाळ विजय सुरुशे, गफ्फार शाह, प्रदीपभाऊ सुरुशे,वसीम पत्रकार, लालू मुल्लाजी,यांनी आमदार सिद्धार्थजी खरात यांच्याकडे पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी केली. आमदारांनी या मागणीची तातडीने दखल घेत आवश्यक निधी मंजूर करून कामाला गती दिली.

उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांनी आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीचे आणि धार्मिक स्थळांच्या सुविधांबाबत असलेल्या संवेदनशील भूमिकेचे कौतुक केले. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम प्रत्यक्षात साकार झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

यावेळी मा. वामनराव झोरे वेदांत आश्रम समिती उपाध्यक्ष , वसंतभाऊ जुमडे पत्रकार , दामोधर लाहोटी वेदांत आश्रम समिती संचालक , डिगांबर सुरुशे, सुमेध देबाजे, गुलाबराव तांगडे, शुभम दानवे यांच्यासह वेदांत आश्रम चे महाराज विकास चाटे व ग्रामस्थ, भाविक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आश्रमाच्या वतीने सांगण्यात आले की, पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसर अधिक स्वच्छ, सुबक आणि सुरक्षित होईल. भाविकांच्या सुविधेसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह असून या विकास कामा बद्दल भाविकांनी आमदार सिद्धार्थ जी खरात आणि पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

*प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *