समता सैनिक दलाची काटोल येथे पदाधिकारी व शाखाध्यक्षांची बैठक संपन्न
काटोल : समता सैनिक दल दीक्षाभूमी, नागपूर ग्रामीण (01) काटोल यांच्या वतीने पदाधिकारी, संघटक तसेच प्रत्येक गावच्या शाखाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच काटोल येथे पार पडली.
बैठकीला जिल्हाध्यक्ष विद्धेश्वर गजबे (बंडूभाऊ), उपाध्यक्ष डॉ. सुनील नारनवरे, सचिव दीपक ढोके, मुख्य शाखा संघटक भागवतजी पाटील, शाखा संघटक विकास सोमकुवर, महिला प्रमुख कमांडर संध्याताई सहारे, संघटक कांताताई गजभिये, संघटक अनिताताई मेश्राम यांच्यासह तपणी, रोहना, हातला, सोनोली सावरगाव व ढवळापुर येथील शाखांचे संघटक आणि शाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत समता सैनिक दलाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात गावागावांत संघटना अधिक बळकट करण्यासाठी सदस्य नोंदणी, शाखा विस्तार, सामाजिक जनजागृती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे साहेबरावजी मेश्राम (पशुवैद्यकीय विभाग ) यांचा समता सैनिक दलाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सोनोली येथील नामदेवजी गजभिये यांचा समता सैनिक दल दीक्षाभूमी, नागपूर ग्रामीण ( 01) यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बैठकीचा समारोप संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.
प्रतिनिधी, अरविंद मदने
