वडोदा पोलिसांची मोठी कारवाई: २१ गोवंशाची सुटका, ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त; सहाय्यक पोलीस निरीक्षक

वडोदा पोलिसांची मोठी कारवाई: २१ गोवंशाची सुटका, ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त; सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे यांच्या टीमची कौतुकास्पद कामगिरी

 

वडोदा – : गोवंश जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा वडोदा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. हर्ष ए. पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, वडोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मनोज गदादे आणि त्यांच्या टीमने ही आज दिनांक.४ ऑगस्ट २०२६ रोजी धडक कारवाई केली. पोलिसांनी २१ गोवंशाची सुरक्षित सुटका केली असून ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तब्बल ५७ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी:वडोदा चौक कुही फाटा येथे नाकाबंदी सुरू असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे यांना गुप्त बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली. आसलवाडा शिवारात काही व्यक्ती वाहनांमध्ये गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेण्याच्या तयारीत होते. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गदादे यांनी वेळ न गमावता पथकासह घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांना पाहून आरोपींची पळापळ, फिल्मी स्टाईलने पाठलाग:पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडोदा पोलिसांनी अत्यंत शिताफीने व धाडसाने पाठलाग करून ५ आरोपींना जागीच पकडले. त्यानंतर सखोल तपास करून आणखी एका मुख्य आरोपीला वडोदा बाजार चौकातून ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेले आरोपी:१) विक्की सुरेश गजभिये (वय ३४, रा. अंबागड, जि. भंडारा)२) शिवचरण उरकुड हटवार (वय ५५, रा. अंबागड, जि. भंडारा)३) अजीत विनायक निर्वाण (वय २९, रा. लाखनी, जि. भंडारा)४) फैजान इरफान कुरेशी (वय ३७, रा. कामठी, जि. नागपूर)५) नुर मोहम्मद मकबुल कुरेशी (वय ३९, रा. कामठी, जि. नागपूर)६) सचिन शिवराम मरकाम (वय ४६, रा. वडोदा)क्रूरतेचा कळस; ४ वाहने आणि मुद्देमाल जप्त करण्यात आले:आरोपींनी जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबले होते. त्यांचे शिंग आणि पाय आखूड दोरीने बांधून क्रूरतेची पराकाष्ठा केली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला:

वाहने: १) १० चक्का ट्रक क्रमांक एम.एच.४०/एन-७५१७, २) बोलेरो पिकअप गाडी क्रमांक. एम. एच.४०/सी.डी-४९०६, ३) बोलेरो गाडी क्रमांक एम. एम-४०/सी.एम-१२४८,४) मारुती सुझुकी कार एम. एच-४०/सी.ओ-९९०७ असे (एकूण ४ वाहने, किंमत ५१,०००,०००/- रुपये)जनावरे: २१ गोवंश (बैल) (किंमत ५,२५,०००/- रुपये)इतर: ४ अँड्रॉइड मोबाईल (किंमत ८०,०००/- रुपये) आणि रोख ३४,४००/- रुपये.असा एकूण५७,३९,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वडोदा पोलीस स्टेशन येथे कडक कलमांखाली गुन्हा दाखल:याप्रकरणी आरोपींवर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि भा.न्या.सं. च्या विविध कडक कलमांखाली वडोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे यांचे कौतुक:वडोदा परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध आणि प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे सहायक पोलीस निरीक्षक श्री. मनोज गदादे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरांतून प्रचंड कौतुक होत आहे. त्यांच्या या तत्पर आणि प्रभावी कामगिरीमुळे नागपूर ग्रामीण पोलिसांची मान उंचावली असून, गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.

ही कारवाही वडोदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे साहेब यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक महेश बोथले, पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोडे, पोलीस हवालदार प्रणयसिंह बनाफर, पोलीस हवालदार दीपक दरोडे, पोलीस शिपाई अतुल निंबार्ते, पोलीस शिपाई शुभम ईश्वरकर, पोलीस शिपाई नितीन सार्वे यांचे चमूने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडले.

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *