वाजे विद्यालयात आनंद मेळावा व स्काऊट गाईड शिबिर संपन्न

*वाजे विद्यालयात आनंद मेळावा व स्काऊट गाईड शिबिर संपन्न…..*

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सिन्नर येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय येथे तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड योजनेअंतर्गत आनंद मेळावा व स्काऊट गाईड शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव ठोक तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ रायते, उपमुख्याध्यापिका मंगल हांडे,शालेय समिती सदस्य भाऊसाहेब गोजरे, अर्जुन गोजरे, माता पालक संघाच्या अध्यक्षा गौरी गायकवाड, पर्यवेक्षक पांडुरंग करपे व विजयानंद कुमावत यांच्या उपस्थितीत लाॅर्ड बेडन पाॅवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर स्काऊट गाईडच्या ध्वजाचे ध्वज पूजन बबनराव ठोक व ध्वजारोहण अर्जुन गोजरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ रायते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यानंतर बबनराव ठोक, अर्जुन गोजरे व भाऊसाहेब गोजरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ रायते यांनी आपल्या प्रास्ताविकेत स्काऊटमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त स्वावलंबन सहकार्य या गुणांचा विकास होतो.पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आनंद मेळाव्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव ठोक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राहुल दौंड यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट व गाईड विभागाचे प्रमुख सुषमा थोरात व मनोहर सोनवणे यांनी केले. तसेच विविध पदार्थांचे स्टॉल प्रमुख तसेच त्यांचे स्टॉल सहकारी आणि कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, मानिषा बनकर,महेंद्र आढाव,दिलीप सहाणे,सुरेश पवार,,नंदू घोटेकर,मिलींद डावरे, विद्या थोरात, सुषमा भवर, संजय शेळके तसेच इतर सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *