उमरखेड पोलिसांचा धडाका; दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस!
अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभाग उघड; डी.बी. पथकाची कौतुकास्पद कामगिरी, ₹९,५०० रोकड जप्त
उमरखेड : उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांचा छडा लावत उमरखेड पोलिसांनी दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तपासात एका अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाला असून चोरीच्या रकमेपैकी ₹९,५०० रोकड जप्त करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मा. अशोक थोरात, पुसद विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. अमर मोहिते (उमरखेड उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार) आणि उमरखेड पोलीस निरीक्षक मा. शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्याचा छडा लावला. सहा. फौजदार विजय पतंगे, पो.हवा. चंदन जाधव, पो.हवा. जय राठोड, पो.हवा. प्रकाश बोंबले , पो.हवा. गिरीश बेंदे, पो.कॉ. संघशिल टेंभरे, पो.कॉ. विष्णू राठोड, पो.कॉ. दिगांबर गिते व पो.कॉ. निवृत्ती महालनवर यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या कर्तृत्वाला नागरिकांची सलाम!
घरफोडीच्या घटनांमुळे निर्माण झालेली चिंता दूर करत पोलिसांनी तत्परतेने केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद व कर्तृत्ववान कामगिरी आहे. या यशामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून उमरखेड पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
गुन्हेगार कोणताही असो, पोलिसांची नजर चुकणार नाही, असा ठोस संदेश या कारवाईतून मिळाला आहे. उमरखेड पोलिसांची अशीच सतर्कता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरी पुढेही सुरू राहो, हीच अपेक्षा!
तालुका प्रतिनिधी बबलू उर्फ मोहम्मद शेख संपर्क क्रमांक: 90679 34036
