नांदेड येथे मा. पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेबांची भेट!
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
नांदेड येथे मा. पोलीस महानिरीक्षक साहेबांची भेट घेऊन पत्रकार देवा चपटे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या संदर्भात निवेदन दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.
तसेच ग्रामीण भागातून वसमत शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंवर कठोर कारवाई करावी, याबाबतही निवेदन देऊन शाळा व क्लासेस सुटण्याच्या वेळेत विशेष पोलीस बंदोबस्त व गस्त वाढवण्याची मागणी केली.
या दोन्ही विषयांवर मा. पोलीस महानिरीक्षक साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि पत्रकारांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारची छेडछाड, दहशत किंवा हल्ला खपवून घेतला जाणार नाही.
न्याय आणि सुरक्षिततेसाठी आमचा संघर्ष कायम सुरू राहील. अशी माहिती
सौ. प्रीतीताई जैस्वाल
महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य
अध्यक्ष, आशादान सेवाभावी संस्था
ता. वसमत, जि. हिंगोली
