पालम तालुक्यात राजकीय भूकंप. गणेशराव रोकडे दादा हाती घेणार धनुष्य बान

पालम तालुक्यात राजकीय भूकंप. गणेशराव रोकडे दादा हाती घेणार धनुष्य बान.प्रतिनिधी. गोरखनाथ शेळके. . पालम तालुक्यातील शेतकरी आणि दिनदलितांचे कैवारी गणेशराव रोकडे दादा हे येत्या ३०ऑगस्ट रोजी शिवसेना (धनुष्य बान)अधिकृत प्रवेश करणार आहेत परभणी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजय बंडू जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून या पक्ष्यपरवेश्यामुळे पालम तालुक्यातील राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे येणाऱ्या काळात पालम नगर पंचायतीवर आता धनुष्य बान फडकणार गणेशराव रोकडे यांच्या शिवबंधनामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत आगामी येत असलेली निवडणूक आता पूर्ण ताकदीने धनुष्य बान चिन्हावर लढवली जाणार आहे रोकडे यांच्या पाठीशी असलेली शेतकरी आणि सर्वसामान्य जनता यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळणार असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता तर समर्थकांमध्ये जलोस दिसून येत आहे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत असून येत्या ३०ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार सुरू आहे येणारी नगर पंचायत धनुष्य बान चिन्हावर लढवून जिंकणार असल्याचे मत गणेशराव रोकडे दादा यांनी व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *