साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा १०६ जयंती उत्सव समाज प्रबोधक डॉ.रामपाल महाराजांच्या खंजिरीच्या आवाजात साजरा*

*साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा १०६ जयंती उत्सव समाज प्रबोधक डॉ.रामपाल महाराजांच्या खंजिरीच्या आवाजात साजरा*

 

पिंपळगाव राजा येथे वीर लहुजी नवयुवक सांस्कृतिक,क्रीडा मंडळ हे दरवर्षी डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतात यावर्षी डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे तैल चित्राचे रथ सजावट करून ढोल ताशांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक पि.राजा गावातून काढण्यात आली. जि. प. हायस्कूल पी.राजा येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक अनंताभाऊ सकळकळे लहुजी शक्ती सेना ता.अध्यक्ष खामगांव व कार्यक्रमाचे अध्यक्ष एड. प्रकाश भाऊ गायकवाड जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांच्या हस्ते डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सूत्रसंचालन संजय भाऊ पाटोळेसर लहुजी शक्ती सेना उप ता.अध्यक्ष व एड.प्रदीप वानखडे लहुजी शक्ती सेना मीडिया प्रमुख खामगांव यांनी केले. कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणातून एड.प्रकाश भाऊ गायकवाड,कृष्णा नाटेकर,उमेश बाभुळकर, गजाननभाऊ सकळकळे यांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे जीवन चरित्र रेखाटले. तसेच अनंता भाऊ सकळकळे यांनी समाजाला संघटित होण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून किशोर खंदारे,मधुकर गायकवाड,धनंजय गायकवाड,निलेश सोनवणे,नितीन सोनवणे इत्यादी प्रमुख पाहुणे हजर होते. भाषणांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर समाज प्रबोधक मा.श्री डॉ. रामपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे प्रशांतराव देशमुख प्रेस क्लब अध्यक्ष खामगांव हे उपस्थित होते.आयोजक सुरज वानखडे,पवन पाटोळे,सहदेव चंदनशिव, दिलीप पाटोळे,संतोष पाटोळे,फकीरा कांबळे यांसोबत समस्त मातंग बांधव व पिं. राजा गावकरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *