न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथील महिला बॅडमिंटन संघाने डी झोन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला

न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथील महिला बॅडमिंटन संघाने डी झोन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा दि.०८/०९/२०२६ रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे आयोजित हिंगोली जिल्हा ‘डी’ झोन बॅडमिंटन (महिला) स्पर्धेत न्यू माॅडेल डिग्री काॅलेज,हिंगोली येथील महिला संघ सहभागी झाला होता.या महिला बॅडमिंटन संघांमध्ये नेहा मस्के,पल्लवी पांचाळ,राजनंदनी चव्हाण,धनश्री खिल्लारी, श्रुती खंडेलवाल यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या यशाबद्दल मा.प्राचार्य डॉ.एन.एस. सोळंके यांनी पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी क्रिडा मार्गदर्शन डॉ काळबांडे एस.आर.,डॉ.गलंडे एल.डी., डॉ. कदम ए.एम.प्रा.चव्हाण बी.बी., प्रा.गोरे जी.यु.,प्रा.कांबळे व्हि. आर., प्रा.किरवले यु.डी., प्रा.शिर्के एस.पी.,यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *