कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी सोयगावात विशेष शिबिर संपन्न……..

कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी सोयगावात विशेष शिबिर संपन्न……..

 

नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करावेत – तहसीलदार मनीषा मेने

 

 

 

 

 

सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे

 

 

 

छत्रपती संभाजीनगर:- जिल्ह्यातील सोयगाव येथे मराठा समाजाला कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सोयगाव तहसील कार्यालय व मंडळ विभागाच्या वतीने आज विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात मराठा समाजातील युवक व नागरिकांना प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे,नोंदी आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार मनीषा मेने यांनी मार्गदर्शन करताना,ज्या नागरिकांकडे कुणबी-मराठा नोंदी उपलब्ध आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करावा,असे आवाहन केले. अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास सोयगाव तहसील कार्यालयातील दीपक फुसे यांच्याशी संपर्क साधावा,असेही त्यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा “मनोज जरांगे पाटील “यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदी व प्रमाणपत्र प्रक्रियेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील पात्र मराठा समाजातील नागरिक व युवकांनी उपलब्ध जुन्या नोंदींची पडताळणी करून शासनाच्या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिबिरासाठी जिल्हाधिकारी विनय गौंडा,उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.नायब तहसीलदार संभाजी देशमुख,मंडळ अधिकारी के.एस.डिघोळे मॅडम,मंडळ अधिकारी शिवाजी सपकाळ बनोटी,एस.के.देवतुळे ग्राम महसूल अधिकारी,क्षितिज निंबाळकर ग्राम महसूल अधिकारी,धनवट,शिल्पा बोपटे ग्राम महसूल अधिकारी पळासखेडा,

संभाजी बोरसे महुसल सेवक,तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सोयगाव तालुका संयोजक विजय काळे,नगरसेवक बंटी भाऊ काळे,कृष्णा पाटील जुनघरे, अविनाश पाटील,दत्तू निकम, अतुल चौधरी,

एकनाथ गोंड,योगेश काळे, गोपाल चौधरी,पकंज देशमुख,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *