नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: १ कोटी २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, ६ आरोपी गजाआड!

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: १ कोटी २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, ६ आरोपी गजाआड!

 

वडोदा (नागपूर):

अवैध रेती आणि मुरूमाची चोरी करणाऱ्या माफियांच्या विरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. वडोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना अवैध मुरूमाची वाहतूक करणाऱ्या ५ ट्रकसह तब्बल १ कोटी २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

🚨 पहाटेच्या गस्तीदरम्यान पोलिसांचा छापा

 

१५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजण्याच्या सुमारास वडोदा पोलिसांचे पथक हायवेवर गस्त घालत होते. नागपूर ते भंडारा हायवेवरील मौजा गुंमथळा शिवारात ५ ट्रक संशयास्पद स्थितीत उभे असलेले पोलिसांना आढळले. संशय आल्याने पोलिसांनी या वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘मुरूम’ (गौण खनिज) भरलेला दिसला. चालकांकडे रॉयल्टी किंवा वाहतुकीचा कोणताही वैध परवाना (Royalty/Permit) नव्हता. पोलिसांना चकवून हा मुरूम चोरून नेला जात असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.

 

🚛 जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: १,००,२५,००० रुपये):

 

पंचसमक्ष पोलिसांनी खालील वाहने आणि मुरूम जप्त केला:

 

अशोक लेलँड ट्रक (क्र. MH 40 CD 0844) – अंदाजे किंमत २० लाख रुपये

 

अशोक लेलँड ट्रक (क्र. MH 40 CD 4944) – अंदाजे किंमत २० लाख रुपये

 

अशोक लेलँड ट्रक (क्र. MH 40 CD 9264) – अंदाजे किंमत २० लाख रुपये

 

अशोक लेलँड ट्रक (क्र. MH 40 CD 9294) – अंदाजे किंमत २० लाख रुपये

 

टाटा ट्रक (क्र. MH 49 BJ 9944) – अंदाजे किंमत २० लाख रुपये

 

२५ ब्रास मुरूम – अंदाजे किंमत २५ हजार रुपये

 

👥 अटक करण्यात आलेले आरोपी:

 

या कारवाईत ५ ट्रक चालक आणि १ ट्रक मालकासह एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे:

१. मनोज अंतराम नेताम (वय ३०, रा. निंबाळकर खदान पांचगाव, कुही) – चालक

२. रवीकांत गोवर्धन चव्हाण (वय ४०, रा. नागेश्वर नगर बिडगाव, कामठी) – चालक

३. राजेश दयाराम भोंडे (वय ४६, रा. पिली नदी कामठी रोड, नागपूर) – चालक

४. आनंदराव भीमराव मानकर (वय ४४, रा. बिबा फरीद नगर, झिंगाबाई टाकळी नागपूर) – चालक

५. विष्णू दयाराम नेताम (वय ३५, रा. निंबाळकर खदान पांचगाव, कुही) – चालक

६. अरविंद वसंतराव राऊत (वय ५४, रा. न्यू सुभेदार ले आऊट, नागपूर) – ट्रक मालक

 

 

या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) सहकलम ४७(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ आणि सहकलम ४, २१ खान आणि खनिजे अधिनियम १९५७ सह कलम ३, ४ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियमान्वये वडोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

👤 ही कामगिरी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. हर्ष ए. पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनिल म्हस्के, आणि कन्हान उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री. शशांत एम. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री. मनोज गदादे व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *