*न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दूल कलाम यांची जयंती साजरी
*
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज हिंगोली येथे आज दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
यांची 95 वी जयंती ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनिल पाटील सर होते. त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
उपस्थित सर्वांनी भारतरत्न डॉ. एम.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवसानिमित्त सर्वांनी ग्रंथालयात ग्रंथ वाचन करून चहापानाने कार्यक्रम कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी प्रा. डॉ. ए. एम. कदम, डॉ. एस. आर. काळबांडे, प्रा. बी. बी. चव्हाण, प्रा. रमेश कोल्हे, प्रा. सुरज बेले, प्रा. रजत सातपुते, प्रा. सुरज बनसोडे, प्रा. स्नेहा शिर्के, प्रा. उषा किरवले, प्रा. अलका करंडे, प्रा. विजे तापडिया, प्रा. आगलावे, डॉ. सिद्धार्थ खंदारे, प्रा. श्याम खर्जुले, प्रा. विजय कांबळे, प्रा. एस. ए. चव्हाण, प्रा. गोरव गोरे, प्रा. अमोल अवचार, प्रा. मधुकर लेमले, प्रा. रियाज प्यारेवाले,
तसेच श्री. गजानन शिंदे, श्री. किरण लोडे,
श्री. अशोक कऱ्हाळे
विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
